गोव्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी कोलवा येथे वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करत, दोन गुन्हेगारांना अटक केली आहे.

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी कोलवा येथे वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करत, दोन गुन्हेगारांना अटक केली आहे. कोलव्यात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविला जात होता. गोवा पोलिसांनी या मसाज पार्लवर धाड टाकून,पाच महिलांची सुटका करत दोघांना अटक केली आहे.

अहो आश्चर्य ! गोव्यात खरंच सापडलं 'दगडाचं हृदय'

याची माहिती मिळाल्यानंतर क्राइम ब्रांचच्या कर्मचार्‍यांनी कोळव्यातील सलून आणि मसाज पार्लरवर छापा टाकला. गुन्हे शाखेचे एसपी शोभित सक्सेना म्हणाले की सूरज शर्मा आणि संतोष सोनवणे यांनी पीडितांना वेश्या व्यवसायासाठी भाग पाडले होते, आरेरावी व धमक्या देऊन त्यांमार्फत वेश्याव्यवसाय चालवला जात होता.

म्हापशात आरक्षणाचा फटका बसला खुद्द भाजपलाच

भारतीय दंड संहिता कलम 370(3) अन्वये गुन्हा शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला असून अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) 1956 च्या 4, 5 आणि 7 व्या कलमाअंतर्गत आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या