Goa Student: डिचोलीतील विद्यार्थ्यांकडून सैनिकांना राख्या

चैतन्य प्रतिष्ठानचा उपक्रम : वाठादेवच्या विशेष विद्यार्थ्यांनी बनविल्या राख्या
Goa Student
Goa StudentDainik Gomantak

डिचोली: केशव सेवा साधना संचालित डिचोलीतील विशेष शाळेच्या मुलांसह विविध शाळांनी तयार केलेल्या राख्या भारतीय सैन्य दलातील जवानांपर्यंत पोचविण्यात येणार आहेत. वाठादेव येथील विशेष शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या दत्तप्रसाद पंडित तसेच चैतन्य प्रतिष्ठानचे प्राचार्य आशीर्वाद मराठे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. शाळेचे अध्यक्ष सागर शेट्ये, व्यवस्थापक मकरंद कामत, शाळेच्या मुख्याध्यापिका संजना प्रभूदेसाई यांचा समावेश होता. मकरंद कामत यांनी प्रास्ताविक केले. संजना प्रभुदेसाई यांनी आभार मानले.

(Protect soldiers from students in bicholim)

Goa Student
Goa Drushti Lifeguards: ‘दृष्टी’ जीवरक्षकांकडून 5 जणांना जीवदान!

मान्यवरांना बांधली राखी

यावेळी प्रमुख पाहुणे निवृत्त सैनिक दत्तप्रसाद पंडित यांच्यासह अन्य मान्यवरांना विद्यार्थ्यांकडून राखी बांधण्यात आली. या कार्यक्रमात के. बी. हेडगेवार, प्रोग्रेस हायस्कूल (साखळी), ज्ञानज्योती हायस्कूल (कारापूर), अवरलेडी हायस्कूल, श्री शांतादुर्गा हायस्कूल (डिचोली), सरकारी हायस्कूल (लाडफे) आदी शाळांनी सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

म्हणून आम्ही सुरक्षित!

प्राण पणाला लावणारे रक्षणकर्ते सैनिक आहेत, म्हणून तुम्ही-आम्ही आणि पूर्ण देश सुरक्षित आहे. जीव धोक्यात घालून भारतीय सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत राख्या पोचवणे म्हणजे सैनिकांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत होईल, असे मुकुंद कवठणकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com