दुधाणेतील पदपुलाची संरक्षक भिंत कोसळली

प्रतिनिधी
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

काणकोण- आगोंद रस्त्यावरील दुधाणे येथील धोकादायक साकवाची संरक्षक भिंत कोसळून साकवालाही धोका निर्माण झाला आहे

काणकोण: काणकोण- आगोंद रस्त्यावरील दुधाणे येथील धोकादायक साकवाची संरक्षक भिंत कोसळून साकवालाही धोका निर्माण झाला आहे त्वरित या साकवाची दुरूस्ती न केल्यास काणकोणहून आगोंदला जाणारा रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्याची पाळी येणार असल्याचे आगोंद पंचायतीचे सरपंच प्रमोद फळदेसाई यांनी सांगितले. गेल्या महिन्यात या साकवाच्या खाली कार उलटून चालक गंभीर जखमी झाला होता.हा साकव रस्त्याच्या तीव्र आडवळणावर आहे.त्याचप्रमाणे या साकवाला कठडा नसल्याने वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहने साकवात कोसळतात.या पूर्वीही अनेक वाहने या साकवात कोसळून अपघातग्रस्त झाली आहेत.साकवाची दुरुस्ती व रस्ता रूंदीकरणाची मागणी केल्यानंतर रस्ता विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतीरोधक बसवले मात्र अपघाताची श्रृखंला थांबली नाही.त्यासाठी आगोंद पंचायतीने या संदर्भात ठराव पास करून सार्वजनिक बांधकाम खात्याला पाठवल्यानंतर या कामाचा अभियंत्यांनी आराखडा तयार केला तर या कामाला मंजूरी मिळून निविदाही जाहीर झाली. मात्र जमिन मालकाच्या आक्षेपामुळे हे काम अडून राहिले.सकारने तातडीचे कलम लावून या साकवाची बांधणी करावी त्यापूर्वी या साकवाच्या दोन्ही बाजूला तात्पुरते अडथळे निर्माण करावेत.रात्रीच्यावेळी या ठिकाणी पथदीप नसल्याने काळोखाचे साम्राज्य असते परगावच्या नागरीकांना त्याचा अंदाज नसल्याने असे अपघात या ठिकाणी घडत असतात असे सरपंच प्रमोद फळदेसाई यांनी सांगितले.या पूर्वी या साकवात पडून परदेशी पर्यटकांचा ही मृत्यू झाल्याचे फळदेसाई यांनी माहिती देताना सांगितले. 

संबंधित बातम्या