मुडकुड येथील बंधाऱ्याची संरक्षक भिंत कोसळली

प्रतिनिधी
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

आगोंद पंचायत क्षेत्रातील मुडकुड येथील बंधाऱ्याची एका बाजूची संरक्षक भिंत कोसळली आहे. दुसऱ्या बाजूची संरक्षक भिंतही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

काणकोण:  आगोंद पंचायत क्षेत्रातील मुडकुड येथील बंधाऱ्याची एका बाजूची संरक्षक भिंत कोसळली आहे. दुसऱ्या बाजूची संरक्षक भिंतही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे बंधाऱ्यालाही धोका असल्याचे पंचायतीचे सरपंच प्रमोद फळदेसाई यांनी सांगितले. 

हा बंधारा शेतीच्या व बागायतीच्या जलसिंचन तसेच भूगर्भ जलपातळी वाढवण्यासाठी माजी मंत्री दिवंगत संजय बांदेकर याच्या कारकिर्दीत उभारण्यात आला होता.या बंधाऱ्याची योग्य देखभाल न केल्याने या बंधाऱ्याची संरक्षक भिंत कोसळली आहे. या बंधाऱ्यावर पदपूल आहे. त्या पदपूलावरून काऱ्यामळ, पारव्यामळ, कुडय येथील रहिवासी ये-जा करतात बंधाऱ्याला धोका निर्माण झाल्यास बंधाऱ्याबरोबर पदपूलही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तीन वाड्यावरील रहिवाश्याचा संपर्क तुटणार असल्याचे सरपंच फळदेसाई यांनी सांगितले. संरक्षक भिंत खचल्याने पाण्याच्या प्रवाहाच्या माऱ्याने जमिनीची मोठ्या प्रमाणात झीज होत आहे. या संदर्भात जलस्रोत खात्याच्याच्या केपे येथील वर्क डिव्हिजन नऊ यांना कळविले आहे, त्याशिवाय उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना तातडीने उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या