Goa: रेईश-मागूश किल्‍ल्याची संरक्षक भिंत कोसळणार

Goa: रेईश-मागूश किल्‍ल्याची संरक्षक भिंत कोसळणार
reis magos fort.jpg

पर्वरी: वेरे येथील रेईश मागुश किल्याजवळील (Reis Magos Fort) संरक्षण भिंत कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे एक ऐतिहासिक वस्तू (Historical architecture) जमीन दोस्त होण्याची भीती स्थानिक व्यक्त करीत आहे. राज्य पुरातत्व खात्याने ही संरक्षण भिंत त्वरित दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले नाही, तर गोवा एका ऐतिहासिक वस्तूला मुकणार आहे. (The protective wall of Reis Magos fort will collapse)

2002 साली माजी मंत्री सुरेश परुळेकर यांच्या कारकिर्दीत एकदा किल्ल्याजवळील रस्ता पूर्ण खचला होता. त्यावेळी मंत्री परुळेकर यांच्या प्रयत्नाने तो रस्ता व संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. आज या गोष्टीला 19 वर्षे होत आली आहेत. त्यानंतर या संरक्षण भिंतीने अनेक लाटा, वारा, पाऊस यांचा मारा सोसला आहे. त्यामुळे ती भिंत पूर्ण कमकुवत झाली आहे. त्यानंतरच्या आमदार, मंत्री यांनी अभावानेच ती दुरुस्त करण्यास पुढाकार घेतला असेल. अजून खऱ्या अर्थाने पाऊस सुरु झाला नसला, तरी ही संरक्षण भिंत कोसळण्याच्या स्थितीत आहे.

पुरातन खात्याने तातडीने संरक्षण भिंत दुरुस्त केली नाही, तर या पावसात निश्चित हा किल्ला जमीनदोस्त होणार यात तिळमात्र शंका नाही. हा किल्ला आमचा पुरातन वारसा आहे. त्यामुळे त्याचे जतन आणि संवर्धन करणे हे सरकार आणि पुरातन खाते यांचे कर्तव्य आहे, असे समाजसेवक राजेश दाभोळकर यांनी सांगितले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com