परवानाधारक टॅक्सी चालकांना पाठिंबा देण्यासाठी धरणे आंदोलन

दैनिक गोमंतक
रविवार, 18 एप्रिल 2021

गोवा माईल्स ही अॅपवर आधारीत टॅक्सीसेवा बंद करावी या मागणीसाठी पर्यटक टॅक्सी परवानाधारक गेले 12  दिवस आंदोलन करत आहेत

मोरजी: गोवा माईल्स ही अॅपवर आधारीत टॅक्सीसेवा बंद करावी या मागणीसाठी पर्यटक टॅक्सी परवानाधारक गेले 12  दिवस आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी चोपडे येथे अॅड प्रसाद शहापूरकर यांनी आज धरणे आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांच्यासोबत अनेकांनी धरणे आंदोलन केले. मागच्या आठवड्यापासून स्थानिक पर्यटक टॅक्सी मालक व्यावसायिक आपल्या मुलाबाळांसोबत आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या मागण्या सरकारने आतातरी मान्य कराव्यात, नाहीतर जसे जनतेने हे सरकार घडवले त्याच सरकारला पायउतार करावे लागेल ,सरकारला जर मागण्या मान्य करता येत नसेल तर त्यांनी सत्ता सोडावी अशी जोरदार मागणी  आज या आंदोलनावेळी करण्यात आली. (protest agitation to support licensed taxi drivers)

गोवा : सांगे पालिकेसाठी  ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

त्यावेळी विविध नेत्यांनी सरकारला वरील प्रमाणे इशारा देऊन सहानुभूतीपूर्वक विचार करून मागण्या मान्य कराव्यात व गोवा माईल्स टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी केली. चोपडे येथे एका दिवसाच्या धरणे आंदोलनाला स्थानिक नेत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला त्यात मगोचे नेते जित आरोलकर ,गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर ,आगरवाड्याचे माजी सरपंच अमोल राऊत ,हरमलचे पंच प्रवीण वायगणंकर ,पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई , टॅक्सी व्यावसायिक संघटनेचे संजय कोले ,पंच मुकेश गडेकर आदींनी भाग घेतला.

दरम्यान गेल्या काही दिवसात  बारा दिवस पणजीच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले होते.  पर्यटक टॅक्सी परवानाधारकांची आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने पावले टाकणे सुरू केले होते. आंदोलनाचा बाराव्या दिवशी आंदोलकांना आझाद मैदानावर प्रवेश नाकारण्यात आलेला होता  आंदोलकांकडून कोणतेही कृत्य घडू नये यासाठी मोठा पोलिस फौजफाटा आझाद मैदान परिसरात तैनात करण्यात आलेला होता.

संबंधित बातम्या