रेल्वे मार्ग दुपदरीकरणाला जोरदार विरोध; पहाटे ५ वाजता सुद्धा तीव्र निदर्शने

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

 काँग्रेस व अन्य पक्षांतील कार्यकर्ते आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी रात्री रेल्वे रूळावर ठाण मांडले होते. त्यात पहाटे पाचपर्यंत आणखी बऱ्याच लोकांची भर पडली. यानंतर जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले. ​

 पणजी- गोव्यात रेल्वेच्या दुपदरीकरणाला विरोध करण्यासाठी सेवाभावी संस्था आणि काही राजकीय पक्षांच्या सहभागाने दक्षिण गोव्यातील चांदरमध्ये मोठे आंदोलन करण्यात आले.   

 काँग्रेस व अन्य पक्षांतील कार्यकर्ते आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी रात्री रेल्वे रूळावर ठाण मांडले होते. त्यात पहाटे पाचपर्यंत आणखी बऱ्याच लोकांची भर पडली. यानंतर जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले. रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. पोर्तूगीज काळापासून असलेल्या या मार्गावरून मुरगावपर्यंत मोठ्या प्रमाणात कोळश्याची वाहतूक केली जाते. गोव्याच्या लोकांना प्रदुषणाचा त्रास होऊ नये, यासाठी या दुपदरीकरणाला जोरदार विरोध करण्यात येत आहे. 

अदानी बंधूंची कंपनी गोव्यात कोळसा वाढवण्याच्या प्रयत्नातून या दुपदरीकरणाचा प्रयत्न करत आहे. या दुपदरीकरणाला विरोधी पक्षांनीही जोरदार विरोध करत पाठिंबा दर्शविला आहे. रविवार व सोमवारी त्यांनी प्रत्यक्ष सहभागी होत रात्रभर रूळावर बसून ठिय्या मांडला होता. 

 दरम्यान, या दुपदरीकरणाला वाढता विरोध लक्षात घेता गोवा सरकारसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पद्धतीचे आंदोलन गोव्यात प्रथमच होत असून हे आंदोलन अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.           

संबंधित बातम्या