कोळसा व रेलमार्ग दुपदराकरण विरोधी दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयावर मोर्चा

 Protesters against coal and railway duplication marched on South Goa Police Headquarters in Madgaon today
Protesters against coal and railway duplication marched on South Goa Police Headquarters in Madgaon today

मडगाव ः कोळसा व रेलमार्ग दुपदराकरण विरोधी आंदोलकांनी आज मडगाव येथील दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयावर मोर्चा नेऊन आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी केली. आंदोलकांना धमकी दिल्या प्रकरणी पोलिस उपअधीक्षक पडुवळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही आंदोलकांनी केली .

 जनतेचा विरोध डावलून रेलमार्ग प्रकल्प पुढे रेटून गोमंतकियांना त्रास करू पाहणारे जिंदाल, अदानी, वेदांता यांच्यासह मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी नोंदवण्याचे आवाहन आंदोलनाचे नेतृत्व करणारे गोयात कोळसो नाका संघटनेचे सहनिमंत्रक अभिजित प्रभुदेसाई यांनी यावेळी केली. होस्पेट, बळ्ळारी येथील उच्च श्रेणीचे खनिज परदेशात विकून पैसा कमवू पाहणारे देशविरोधी असून त्यांच्या विरोधात देशद्रोही म्हणून तक्रार दाखल केली पाहिजे असे प्रभुदेसाई यांनी सांगितले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com