...अन्यथा आज मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर गोवा शिक्षकांचा ठिय्या

गेला चार दिवसांपासून हे अर्धवेळ शिक्षक अहोरात्र आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत.
...अन्यथा आज मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर गोवा शिक्षकांचा ठिय्या
Protesting teachers from Goa will present in front of CM Pramod Sawant house todayDainik Gomantak

पणजी: अर्धवेळ शिक्षकांच्या मागण्यांकडे सरकारचे (Goa Government) दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे शासकीय निवासस्थान ‘महालक्ष्मी’समोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे. गेला चार दिवसांपासून हे अर्धवेळ शिक्षक अहोरात्र आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत.

नोकरीत कायम करावे, ही या शिक्षकांची मागणी असून त्यांनी दिवाळीपूर्वी आंदोलन छेडले होते. दिवाळीच्या तोंडावर मुख्यमंत्री सावंत यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. पण त्यांच्याकडून काहीच कार्यवाही न झाल्याने गेल्या चार दिवसांपासून पुन्हा 54 शिक्षकांनी अहोरात्र आंदोलन आरंभले आहे. त्यात महिलांचाही समावेश असून राज्य सरकारसाठी ही शरमेची बाब असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

Protesting teachers from Goa will present in front of CM Pramod Sawant house today
गोव्यातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांच्‍या सचिवांनी आंदोलकांना भेटण्याची ग्वाही दिली आहे. पण ठोस आश्‍वासन न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासास्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षक गंगाराम लांबोर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com