समर्थकांनी केला अटकेचा निषेध

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणाच्या गुन्ह्यात पत्रकार अर्णव गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्य भाजपला लोकशाहीच्या चौथा स्‍तंभ धोक्यात आल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच या अटकेच्या निषेध समाज माध्यमावर करणे सुरु केले.

पणजी: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणाच्या गुन्ह्यात पत्रकार अर्णव गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्य भाजपला लोकशाहीच्या चौथा स्‍तंभ धोक्यात आल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच या अटकेच्या निषेध समाज माध्यमावर करणे सुरु केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदींसह गाव पातळीवरील भाजप नेत्यांनी या अटकेचा निषेध केला.

एरव्ही पत्रकारांना धमक्या आल्या, मारहाणीचे प्रकार घडले तरी मुक साक्षीदाराची भूमिका बजावणारे बरेचजण आज कमालीचे सक्रीय झाल्याचे दिसले. गोस्वामी हेच एकमेव लोकशाहीचे तारणहार असलेले पत्रकार आहेत आणि न्यायालयात त्यांचे निर्दोषत्व सिद्ध होण्याआधीच त्यांच्या निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब करण्यावर आज चढाओढ सुरु होती. भारतीय जनता युवा मोर्चाने भाजप कार्यालयाच्या परिसरात गोस्वामींच्या अटकेचा निषेध करण्यासाठी निदर्शने केली.

गोस्वामींवर झालेली पोलिस कारवाई हे ते पत्रकार म्हणून कर्तव्य बजावताना झालेली नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गोवा श्रमिक पत्रकार संघटनेने गोस्वामींच्या अटकेचा निषेध करणारे पत्रक तत्परतेने जारी केले.

संबंधित बातम्या