गोवा नदी परिवहन खात्याच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

गेले सत्तावीस महिने जादा कामाचा भत्ता न दिल्याच्या निषेधार्थ व सरकारच्या नदी परिवहन खात्यातील कर्मचाऱ्यांनी आज निदर्शने केली.

पणजी: गेले सत्तावीस महिने जादा कामाचा भत्ता न दिल्याच्या निषेधार्थ व सरकारच्या नदी परिवहन खात्यातील कर्मचाऱ्यांनी आज निदर्शने केली. नदी परिवहन खात्याच्या येथील मुख्य कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यांना पाचव्या वेतन आयोग ऐवजी सातव्या वेतन आयोगाचा नुसार जादा कामाचा भत्ता मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. याशिवाय गणवेश दिले जावेत, शिलाई भत्ता दिला जावा, उपहार ग्रह भत्ता दिला जावा, अशा मागण्याही त्यांनी केल्या आहेत. हे कर्मचारी राज्यातील विविध जलमार्गावर सुरू असलेल्या फेरिबोट सेवेत आपली सेवा बजावतात.

खाणकाम बंदी आदेशाचा होणार फेरविचार; सर्वांच्‍या नजरा सर्वोच्च न्‍यायालयाकडे -

गोवा नगरपालिका निवडणुक :  सरकारने आरक्षण करताना कोणताही पक्षपात केला नाही:  मुख्यमंत्री प्रमोद सावंत -

संबंधित बातम्या