खाणी परत सुरू करण्यासाठीचा निषेध मोर्चा पुढे ढकलला  

दैनिक गोमन्तक
रविवार, 14 मार्च 2021

राज्यातील लोह खनिजाच्या खाणी परत सुरू करण्यास राज्य सरकारला आलेल्या अपयशाबद्दल 16 मार्च रोजी राजधानी पणजीत काढण्यात येणारा निषेध मोर्चा गोवा खाण लोक मंचने तूर्त पुढे ढकलला आहे.

पणजी : राज्यातील लोह खनिजाच्या खाणी परत सुरू करण्यास राज्य सरकारला आलेल्या अपयशाबद्दल 16 मार्च रोजी राजधानी पणजीत काढण्यात येणारा निषेध मोर्चा गोवा खाण लोक मंचने तूर्त पुढे ढकलला आहे. मंचाचे अध्यक्ष पुती गावकर यांनी सरकारला 15 मार्चपर्यंत खाणी सुरू करण्यासाठी मुदत दिली होती. अन्यथा खाणकाम करण्यासाठी लागणारी सामग्री, बार्ज, ट्रक आणि इतर वाहनांसह राजधानी पणजीत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 

राज्य निवडणूक आयुक्त चोखा राम गर्ग यांनी दिला राजीनामा

आज पुती गावकर यांनी हे आंदोलन पुढे ढकलत असल्याचे निवेदन जारी केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की आठ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीवेळी खाणी सुरू करण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन अंतिम टप्प्यावर आहे आणि सध्या पणजी महापालिकेची निवडणूक सुरू आहे असे मुद्दे सरकारने मांडले. त्यामुळे या दोन्ही कारणांमुळे तूर्त आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

 

संबंधित बातम्या