आरोप सिद्ध करा, अन्यथा माफी मागा 

GUJ
GUJ

पणजी

कोणत्याही बातमीची शहानिशा न करता चुकीच्या किंवा रेडिमेड बातम्या किंवा पेडन्यूज पत्रकार छापून आणतात असा आरोप करण्यात आला होता त्यासंदर्भातचे पुरावे सादर करावेत अन्यथा सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी माफी मागावी अशी मागणी गोवा श्रमिक पत्रकार संघटनेने केली आहे. त्यांच्या या आरोपांचा संघटनेतर्फे निषेध करण्यात आला आहे. 
राज्यातील पत्रकारासंदर्भात सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी केलेली विधाने लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्याची बदनामी करणारी आहे. पत्रकारांना त्यांनी ‘पत्रेकार’ असे हिणवले आहे. त्यांनी केलेले हे आरोप सिद्ध करावेत. व्हीपीके अर्बन सहकारी संस्थेवर निर्बंध लादण्यात आलेल्या प्रकरणी त्यांनी केलेली वैयक्तिक वक्तवे राज्यातील पत्रकारांचा अपमान करणारी आहेत. या पतसंस्थेवरून होत असलेल्या राजकारणात पत्रकारांना बदनाम केले गेले आहे. त्यांनी पत्रकारांवर टीका करून वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज नव्हती. जे पत्रकार ‘पेडन्यूज’ छापतात त्यांची नावे पुराव्यासह उघड करावीत. सरसकटपणे त्यांनी कोणतेही पुरावे नसतानाचे आरोप करू नयेत. त्यांनी आपला सूड पत्रकारांवर टीका करून काढू नये तर ज्या व्यक्तीला त्यांना संबोधायचे असते त्याचे नाव सरळ घ्यावे. अशाप्रकारे वक्तव्ये करून सर्वच पत्रकारांना ग्राह्य धरू नये. 
सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी बाजू व्यवस्थित मांडण्याऐवजी चुकीच्या बातम्या दिल्या जातात किंवा प्रसिद्ध पत्रके त्याची शहानिशा न करता ती छापली जातात किंवा या बातम्या ‘पेडन्यूज’ स्वरुपात छापल्या जातात याचे पुरावे त्यांनी उघड करावेत. जर कोणी पत्रकार ‘पेडन्यूज’मध्ये गुंतलेला असेल तर संघटनेतून त्या पत्रकाराला डिच्चू देण्यास तसेच त्याचे सदस्यत्व रद्द करण्यास घाबरणार नाही. जर त्यांच्याकडे केलेल्या आरोपांचे पुरावे नसतील तर त्यांनी संघटनेची माफी मागावी अशी मागणी ‘गुज’ने केली आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com