गोव्यात दिड दिवसांचा जाहीर कार्यक्रमांना फाटा

मंडळाने पूजलेल्या मंगलमूर्ती गणरायाचे उद्या विसर्जन
गोव्यात दिड दिवसांचा जाहीर कार्यक्रमांना फाटा
गणेशोत्सवTukaram Sawant

डिचोली: डिचोली (Bicholim) सार्वजनिक मंडळाच्या गणेशोत्सवाला (Ganeshotsav) उत्साहात प्रारंभ झाला असून, 'कोविड' महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा मंडळातर्फे दीड दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मंडळाने पूजलेल्या मंगलमूर्ती गणरायाचे उद्या (शनिवारी) सायंकाळी विसर्जन करण्यात येणार आहे. महामारीमुळे यंदाही जाहीर कार्यक्रमांना फाटा देण्यात आला असला, तरी मंडळातर्फे ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

विधिवत पुजन

शुक्रवारी सकाळी पारंपरिक गणपती पूजन मंडपात सार्वजनिक मंडळातर्फे मंगलमूर्ती गणरायाच्या मूर्तीची विधिवत स्थापना करून पूजन करण्यात नंतर आरती झाली. तत्पूर्वी गुरुवारी रात्री चित्रशाळेतून गणपतीची मूर्ती पूजनस्थळी आणण्यात आली. शनिवारी वाजतगाजत रात्री पारंपरिक नदीत गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. यंदाही चित्रकार मिलिंद तेली यांनी गणपतीसमोर आकर्षक सजावट केली आहे.

गणेशोत्सव
Ganesh Chaturthi: आज सायंकाळी आकाशात पाहाच

ऑनलाईन स्पर्धा

गणेशोत्सवानिमित्त मंडळातर्फे माटोळी, गणपती देखावा, महिलांसाठी रांगोळी, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, महिलांसाठी घरगुती फुगडी आणि बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. सर्व स्पर्धा ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. बुद्धीबळ वगळता अन्य सर्व स्पर्धा पालिका मर्यादित असून, 15 सप्टेंबरपर्यंत संबंधित स्पर्धेचा व्हिडिओ पाठवणे आवश्यक आहे. बुद्धिबळ स्पर्धा 17 रोजी सायंकाळी 6 वा. ऑनलाईन घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा डिचोली तालुका मर्यादित आहे. खाली दिलेल्या स्पर्धा प्रमुखांशी संपर्क करून संबंधित स्पर्धांचे व्हिडिओ पाठवावेत. असे आयोजकांनी कळवले आहे.

गणेशोत्सव
Goa Ganesh Festival: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने 'गोव्यातील ऐतिहासिक गणपतीचे' खास दर्शन

माटोळी स्पर्धेसाठी समरेश काणेकर (9823637050), घरगुती देखावा स्पर्धेसाठी रिमा काणेकर (9823463872), रांगोळी आणि बुद्धिबळ स्पर्धेसाठी सत्यवान हरमलकर (9923484955), चित्रकला स्पर्धेसाठी मिलिंद तेली (9326120894) आणि फुगडी स्पर्धेसाठी तुषार फळारी. (9764623104).

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com