सांगे तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्‍सव दीड दिवसांचा

Manoday Fadate
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

सांगे तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा गणेशोत्‍सव यंदा अकरा दिवसांऐवजी दीड दिवसाचा साजरा करण्याची तयारी सर्व मंडळांनी केल्याने सरकारवरील ताण कमी झाला आहे.

सांगे

सांगे तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा गणेशोत्‍सव यंदा अकरा दिवसांऐवजी दीड दिवसाचा साजरा करण्याची तयारी सर्व मंडळांनी केल्याने सरकारवरील ताण कमी झाला आहे. धार्मिक विषयात सरकारने आपला फतवा काढण्यापेक्षा सांगेतील सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळानी महामारीच्या कठीण प्रसंगात सरकारला अडचणीत आणण्यापेक्षा सामाजिक जबाबदारी स्वीकारून सांगेतील सर्व सार्वजनिक गणेश मंडळानी यंदा दीड दिवसाचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘कोविड’ महामारीत अकरा दिवस सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करून कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यापेक्षा कित्‍येक वर्षांची अकरा दिवशीय उत्सव साजरा करण्याची परंपरा यंदा प्रथमच खंडित होणार आहे. पुढील वर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्‍सव साजरा करण्यासाठी मंगलदिन प्राप्त होवो, अशीच प्रार्थना करण्याचा संकल्प आज सांगे पालिका सभागृहात सर्व गणेश मंडळाच्या बैठकीत घेण्‍यात आला. ही बैठक सांगेचे मामलेदार मनोज कोरगावकर यांनी सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
आजच्या बैठकीला सार्वजनिक मंडळापैकी सांगेतील सर्वांत ज्‍येष्‍ठ मंडळ संगमपूर सार्वजनिक गणेश मंडळ, सावर्डे गणेश मंडळ, सिद्धिविनायक गणेश मंडळ कोंगारे भाटी, वाडे कुर्डी सार्वजनिक गणेश मंडळ, नेत्रावळी सार्वजनिक गणेश मंडळ, गो माता सार्वजनिक गणेश मंडळ नेत्रावळी, तुडव गणेश मंडळ, कोळंब सार्वजनिक गणेश मंडळ, ऋषिवन गणेश सार्वजनिक मंडळ, काले कृषी फार्म गणेश मंडळ, कोठार्ली वेळीप समज, सांगे पोलिसस्थानक व मंडळाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

Editing _ sanjay ghugretkar

 

 

संबंधित बातम्या