CZMP: राष्ट्रीय हरित लवादाने फटकारल्यानंतर यंत्रणा कामाला; उत्तर व दक्षिण गोव्यात एकाच दिवशी जनसुनावणी

दैनिक गोमंतक
बुधवार, 9 जून 2021

‘सीझेडएमपी’ 8 जुलैला नव्याने जनसुनावणी

 

पणजी: राज्याचा अंतिम किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडाच्या (CZMP) मसुद्यावरील जनसुनावणीसंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal) फटकारल्यानंतर गोवा सरकारतर्फे (government of goa) उत्तर व दक्षिण जिल्ह्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी 8 जुलै रोजी सकाळी 10 वाजता जनसुनावणी ठेवण्यात आली आहे. हरकती व सूचना सादर करण्याची मुदत 30 जून पर्यंत ठेवण्यात आली आहे. नोंदणी केलेल्यांनाच या जनसुनावणीसाठी उपस्थित राहता येणार आहे. उत्तर गोव्यात कांपाल येथील परेड मैदानावर तर दक्षिण गोवा (South Goa) नियोजन व विकास प्राधिकरण मैदानावर (SGPDA) ही सुनावणी घेतली जाणार आहे. जनसुनावणीसाठीची जागा मोठी असल्याने जनतेला त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. (Public hearing in CZMP case in North and South Goa on the same day)

दरम्यान, गेल्या आठवड्यात राष्ट्रीय हरित लवादाने सरकारने घेतलेली जनसुनावणी रद्द केली होती व ही जनसुनावणी नव्याने घेण्याचा आदेश दिला होता. अंतिम आराखड्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची मुदत लवादाने ३१ ऑगस्टपर्यंत वाढवून दिली आहे. त्यामुळे सरकारने या जनसुनावणीसाठी लवादाने नमूद केलेल्या निर्देशानुसार प्रक्रिया सुरू केली आहे. घिसाडघाईने आराखडा तयार करणाऱ्या सरकारला लवादाच्या या आदेशाने चपराक बसली होती.

Goa: बावीस कोटींच्या IVERMECTIN प्रकरणात औषध खरेदी समिती बरखास्त

बाजू मांडण्याची संधी
या नव्याने घेण्यात येणाऱ्या जनसुनावणीसाठी राज्यातील सर्व घटकांतील लोकांना आपापल्या हरकती तसेच सूचना या जनसुनावणीवेळी मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्या सर्वांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच सरकारला हा आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यामुळे राज्यातील किनारपट्टी परिसरात राहणाऱ्यांची सत्यपरिस्थिती तसेच समस्या याची बाजू मांडता येणार आहे. मागील जनसुनावणीस सरकारने ती झटपट गुंडाळण्याचा प्रयत्न केला होता. अनेक लोकांना तसेच काही पर्यावरणप्रेमी संस्थांना डावलून ही सुनावणी घेतली गेली होती. जनसुनावणीच्या बाहेर लोकांनी प्रखर विरोध केला होता. लोकांचे अधिकार डावलून ही सुनावणी घेतल्याने तसेच हरकतींच्या अर्जावर बाजू मांडण्यास न दिल्यासंदर्भातची याचिका लवादाकडे सादर झाली होती. 

काय आहे आदेशात ?

किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याच्या जनसुनावणीसंदर्भातची नोटीस आदेश मिळाल्यापासून एका आठवड्याच्या आत जारी करून ती वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात यावी. त्यामध्ये जनसुनावणीची तारीख व वेळ नोटीस जारी केल्यापासून एका महिन्याच्या आत निश्चित करण्यात यावी. 

Goa: ''सरकारच्या कोविड व्यवस्थापनाची न्यायालयीन चौकशी करावी'...

दोन ठिकाणी ही जनसुनावणी घेतली जाणार असल्याने त्या ठिकाणी जनतेसाठी पुरेशी क्षमता आहे, तसेच जनसुनावणी कशा पद्धतीने घेतली जाणार आहे हे उघड करण्यात यावे. लेखी हरकती मागण्यासाठी वेळ ठरवली जावी असे आदेशात नमूद करण्यात आले होते. 

या आराखड्यामुळे ज्यांना नुकसान होण्याची संभावना आहे त्या सर्व घटकांमधील निवेदने स्वीकारण्यात यावीत, गरज पडल्यास ही जनसुनावणी एका दिवसापेक्षा अधिक दिवस सुरू ठेवली जावी, सर्वांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळावी असे लवादाने निरीक्षण केले होते.

संबंधित बातम्या