खांडोळा सम्राट क्लबतर्फे लोकोपयोगी उपक्रम

प्रतिनिधी
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, मार्गदर्शन, पोलिसांचा गौरव, शाळेच्या आवारात वृक्षारोपण

खांडोळा: माशेल पंचक्रोशीत ‘देश प्रथम सप्ताहा’निमित्त खांडोळा सम्राट क्लबतर्फे विविध उपक्रम राबविण्‍यात आले. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात स्पर्धा, मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे  ९ ते  १५ ऑगस्ट दरम्यान आयोजन करण्यात आले.  

सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अध्यापकांतर्फे शाळेच्या आवारात विविध झाडांचे रोपण केले. त्यानंतर अध्यक्ष मनोज कारापूरकर, सचिव काजल चोडणकर व सदस्य जयराम परब यांनी माशेल पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांचा सत्कार करण्यात आला व त्यांना राखी बांधण्यात आली. कोविड योद्ध्याचा गौरव करण्यात आला.

कृष्णा परब याचा १० वीच्या शालान्त परीक्षेतील यशाबद्दल क्लबतर्फे गौरव करण्यात आला. सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, बेतकी येथे जाऊन कोरोना योद्ध्यांचा गौरव केला. यावेळी  डॉ. ब्रॅन्डा पिंटो, डॉ. संगीता केळूस्कर, डॉ. सुदिन नाईक,  सुनिता नाईक, राजीव घाटवल,  सिद्धेश गांवस यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य केंद्रातर्फे डॉ. संगिता केळूस्कर यांनी सम्राट क्लब खांडोळाचे आभार मानले. सोहळ्याला सम्राट क्लब खांडोळातर्फे दोन कार्यक्रम गुगल मीटद्वारे आयोजित केले होते. त्यात विद्यार्थ्यांसाठी भालचंद्र आमोणकर यांचे मार्गदर्शन लाभले. संयोजन जयराम परब यांनी केले. गुगल मीटद्वारेच बासुरीवादन कार्यक्रम समीर प्रभू यांनी सादर केले. त्यानंतर या सप्ताहात ऑनलाईन रांगोळी स्पर्धा- विषय (कोविड १९ महामारी) आणि देशभक्तीपर एकेरी गीतगायन स्पर्धा, १३ ऑगस्ट २०२० ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा स्वातंत्र्य दिवस,  इको फ्रेंडली राखी स्पर्धा घेण्यात आली.

विठ्ठल सुखटणकरांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. शिक्षिकांसाठी देशभक्तीपर एकेरी गीतगायन स्पर्धा, वनमहोत्सव फोटोग्राफीचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक विद्यालयांसाठी वेगवेगळ्या १२ ऑनलाईन स्पर्धा घेतल्या. या स्पर्धेत सरकारी प्राथमिक विद्यालय, अमेयवाडा, सरकारी प्राथमिक विद्यालय हळदणवाडा  सरकारी प्राथमिक विद्यालय गांवकरवाडा, सरकारी प्राथमिक विद्यालय बेतकी, सरकारी प्राथमिक विद्यालय तळे-बेतकी, सरकारी प्राथमिक विद्यालय वाडे-बेतकी, लोकप्रतिष्ठान स्पेशल चिल्ड्रन्स स्कुलच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

मनोज कारापूरकर, काजल चोडणकर, खजिनदार अरुणा सोमण व सदस्य जयराम परब यांनी प्राथमिक विद्यालयांनी व लोकप्रतिष्ठान स्पेशल शाळेला भेट देऊन बक्षिसे दिली.

संबंधित बातम्या