भंडारी समाज युवा समितीच्या आरतीसंग्रहाचे प्रकाशन

सुदेश आर्लेकर
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

गोमंतक भंडारी समाज युवा समितीतर्फे गणेशचतुर्थी उत्सवानिमित्त काढलेल्या आरतीसंग्रहाचे प्रकाशन म्हापसा येथील येथील श्री बोडगेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या प्रगती संकुलात प्रांगणात करण्यात आले

म्हापसा
गोमंतक भंडारी समाज युवा समितीतर्फे गणेशचतुर्थी उत्सवानिमित्त काढलेल्या आरतीसंग्रहाचे प्रकाशन म्हापसा येथील येथील श्री बोडगेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या प्रगती संकुलात प्रांगणात करण्यात आले. 
यावेळी माजी मुख्यमंत्री तथा फोंडा मतदारसंघाचे आमदार रवी नाईक, साळगावचे आमदार जयेश साळगावकर, शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर, जलस्रोत खात्याचे माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर, उत्तर गोवा भाजपा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, महिला विभागाच्या अध्यक्ष शुभांगी गुरुदास वायंगणकर, म्हापशाचे माजी नगराध्यक्ष समाजाचे बार्देश तालुका अध्यक्ष सुधीर कांदोळकर, युवा विभागाचे अध्यक्ष सुप्राज नाईक तारी यांचीही उपस्थिती होते. 
युवा विभागाचे उपाध्यक्ष गुणाजी मांद्रेकर, सचिव दीक्षित दिगंबर नाईक, कार्यकारिणी सदस्य रणजित उसगावकर, अखिल शिरोडकर, पंकज जल्मी, प्रवीण आसोलकर, रत्नदीप नाईक तसेच तिसवाडी शाखेचे उपाध्यक्ष जयेश नाईक व उत्तर गोवा समन्वयक समीर दयानंद मांद्रेकर यांनीही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली होती. 
युवा विभागाचे महासचिव मशाल आडपईकर यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रवीण आसोलकर यांनी आभार मानले.

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या

Tags