गोव्यातील नामवंत लेखक तोमाझिन यांच्या चरित्र पुस्तकाचे प्रकाशन

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

पुस्तकाचे प्रकाशन आर्चबिशप ऑफ गाेवा ॲण्ड दमणचे फिलीप नेरी फेर्राव यांच्या हस्ते झाले.

पणजी: गोव्यातील नामवंत लेखक, तियात्रिस्ट, राजकारणी, वक्ता, गीतकार, कवी म्हणून आयुष्यभर कार्यरत असलेले श्री. तोमाझिन कार्दोज यांच्या 75 व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यावरील चरित्र पुस्तकाचे विमोचन झाले. या चरित्र पुस्तकाचे नाव ‘स्पिकिंग आऊट दि लाईफ ॲन्ड टाइम्स ऑफ तोमाझिन’ असे आहे. पुस्तकाचे प्रकाशन आर्चबिशप ऑफ गाेवा ॲण्ड दमणचे फिलीप नेरी फेर्राव यांच्या हस्ते झाले. कला व संस्कृती भवनच्या सभागृहात या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकांचे लेखक वॉल्टर मिनेझिस यांनी पुस्तक लेखनासाठी परिश्रम घेतले. दाल्गादो अकादमीने या कृतीला सहाय्य केले. या पुस्तकातील ठळक वैशिष्ट्ये सांगून हे पुस्तक वाचून त्यातली जीवनमूल्ये तरुणांनी समजून घेतली पाहिजे, असे पुस्तकाविषयी बोलताना प्रसिद्ध संशोधक श्री  नंदकुमार कामत म्हणाले. तोमाझिन कार्दोजच्या विविध गुण व पैलूंविषयी लोकांस जाण करून दिली. (Publication of Tomazin's biography)

कृषी खात्याच्या ढिगभर योजना, पण गोमंतकीयांना लाभ मिळेना!

दाल्गादो कोकणी अकादमीने तोमाझिन कार्दोज यांच्या या  चरित्रात्मक पुस्तक प्रकाशनाचा गौरव केला.नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या  या पुस्तकाची एक प्रत आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांनी तोमाझिन याना भेट दिली व शुभेच्छा दिल्या.डिकेड अध्यक्ष श्री विन्सी क्वाद्रूज यांनी सर्वांची मनःपूर्वक स्वागत केले व लेखकांचे अभिनंदन केले. तर यावेळी डिकेड सेक्रेटरी विलियम फेर्नांडीस यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिकेए उपाध्यक्ष-डेनियल डिसौजा यांनी केले. एलौशा डिसौजा व एलौरा डिसौजा या सांताक्रुजच्या कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
 

संबंधित बातम्या