Goa News |Marathi Language
Goa News |Marathi LanguageDainik Gomantak

Goa News: गोव्याचे राजपत्र मराठीतूनही प्रसिद्ध करा!

मराठी राजभाषा समितीतर्फे मुख्यमंत्री सावंत यांना गोवा राज्याचे राजपत्र मराठीतून प्रसिद्ध करण्यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे.

Goa News: गोवा राज्याचे राजपत्र मराठीतून प्रसिद्ध करण्यासंबंधीचे निवेदन मराठी राजभाषा समितीतर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना देण्यात आले आहे.

राज्यात मराठी आणि कोकणी या समान भाषा असून ज्याप्रमाणे सरकारने कोकणीतून राजपत्र प्रसिद्ध करण्याचा निर्णय अधिवेशनात घेतला आहे, त्याच धर्तीवर मराठीचाही सन्मान करताना राजपत्र मराठीतून प्रसिद्ध करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा असे या निवेदनात म्हटले आहे.

राजपत्र कोकणीतून प्रसिद्ध करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे मराठीप्रेमी स्वागतच करीत आहे, पण मराठीलाही तोच सन्मान द्यावा अशी मागणी मराठीप्रेमींनी केली आहे.

गोव्याच्या राजभाषा कायद्यामध्ये मराठी भाषेचीही नोंदणी आहे. याशिवाय गोवा राजभाषा कायद्यांतर्गत राज्याच्या कोणत्याही सरकारी कामकाजात मराठीचा वापर करू शकता, असेही नमूद करण्यात आले आहे.

Goa News |Marathi Language
Government Scheme: ‘लाडली लक्ष्मी’च्या पैशांचा योग्य पद्धतीने विनियोग व्हायला हवा

यावरून गोवा राज्याच्या प्रमुख भाषा कोकणी व मराठी आहे आणि त्याचा पुरस्कार गोवा राजभाषा कायदा प्रामुख्याने करीत असल्याने मराठीतूनही राजपत्र प्रसिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य द्यावे, अशी मागणी मराठी राजभाषा समितीने केली आहे.

गोव्याचे राजपत्र मराठीतूनही प्रसिद्ध करावे, सरकारी संकेतस्थळेही इंग्रजीसोबत मराठीतूनही असावीत. समितीचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर यांच्या सहीनिशी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com