Punishment to Ramesh Tawadkar till the court proceeding ends
Punishment to Ramesh Tawadkar till the court proceeding ends

रमेश तवडकर यांना न्यायासन उठेपर्यंत शिक्षा

काणकोण : खोतीगावातील पुनो वेळीप यांना तीन वर्षांपूर्वी माजी मंत्री रमेश तवडकर यांनी वाटेत अडवून धमकी दिल्याचा आरोप सिद्ध झाल्याने काणकोण प्रथम सत्र न्यायालयाने बुधवारी (ता. २८)  त्यांना न्यायासन उठेपर्यंत न्यायालयात बसून राहण्याची शिक्षा ठोठावली.त्याचप्रमाणे मारहाण केल्या प्रकरणी पांचशे रूपयाचा दंड व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पांच हजार रूपयाचा दंड ठोठावला.

निवाड्याच्या ३० दिवसाच्या आंत दंडाची रक्कमन भरल्यास एका महिन्याची कैदेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. त्याशिवाय दहा हजार रूपये आरोपीने दहा हजार रूपये न्यालयाच्या नाझिरकडे तीस दिवसाच्या आंत भरपाई म्हणून जमा करावेत.ही रक्कम तक्रारदार पुनो वेळीप याना देण्यात यावी असेही न्यायालयाने निवाड्यात नमूद केले 
आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com