पणजीत आठवडाभर पुरुमेताचा बाजार

dainik gomantak
शनिवार, 23 मे 2020

मडकईकर म्हणाले की, पावसाळ्यातील बेगमीसाठी स्थानिक विक्रेत्यांकडील शेतीमाल आणि इतर वस्तू लोक घेऊन जातात. यापूर्वी अर्बन हेल्थ सेंटरसमोरील रस्त्यावर पुरुमेताचा बाजार भरत होता.

पणजी, 

पावसाळ्यातील बेगमी करण्यासाठी स्थानिक विक्रेत्यांकडील वस्तूंना चांगली मागणी असते. त्यासाठी पुरुमेताचा बाजार भरविला जातो, यंदा पणजीतील पुरुमेताचा बाजार २४ ते ३१ असा आठ दिवसांचा असणार असल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
मडकईकर म्हणाले की, पावसाळ्यातील बेगमीसाठी स्थानिक विक्रेत्यांकडील शेतीमाल आणि इतर वस्तू लोक घेऊन जातात. यापूर्वी अर्बन हेल्थ सेंटरसमोरील रस्त्यावर पुरुमेताचा बाजार भरत होता. तो काही दिवसांसाठी असायचा. परंतु यावेळी स्थानिक विक्रेत्यांना अधिक काळ आपले साहित्य विक्रीसाठी मिळावे म्हणून एक आठवड्याचा काळ त्यांना दिला जाणार आहे. त्यासाठी मार्केटमधील भाजीपाला विक्रेत्यांना ज्या पद्धतीने दुकानांची आखणी करून देण्यात आली आहे, त्यापद्धतीने पुरुमेतातील वस्तू विक्री करणाऱ्यांना सोय करून दिली जाणार आहे.
सामाजिक अंतर राखून ग्राहकांनी खरेदी करावी, असे आम्ही आवाहन करीत आहोत. कोरोनाचे संकट जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर हा आता अंगवळणी करावा लागणार आहे, असेही मडकईकर म्हणाले.

 

संबंधित बातम्या