Quepem: लाच स्वीकारताना पुरवठा निरिक्षकास रंगेहाथ पकडले; न्यायलायाने केले निर्दोषमुक्त!

केपे येथील मुनलाईट नामक हॉटेलात पकडले होते रंगेहाथ
court
court Dainik Gomantak

मडगाव: लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले तरी घेतलेले पैसे नेमके कोणत्या कारणासाठी होते हे अभियोग पक्ष सिद्ध करू न शकल्याने दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांनी आज नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक जर्सी पिंटो यांची निर्दोश मुक्तता केली.

(Quepem civil supply officer Jersey Pinto was acquitted by the court)

पिंटो हे नागरी पुरवठा खात्याच्या केपे कार्यालयात निरीक्षक म्हणून जून 2006 मध्ये कार्यरत होते. काकोडा येथील स्वस्थ धन्य दुकानदार प्रमोद त्यांच्या विरोधात बोरकर यांनी केपे मामलेदारासामोर बोरकर यांच्या विरोधात चालू असलेली चौकशी बंद करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

court
Deviya Rane: आमदार होताच कामाचा धडाका; पर्येत दिव्या राणेंकडून विविध विकासकामांना हिरवा कंदील

त्यानुसार 2 जून 2006 रोजी रसायन लावलेल्या नोटा तक्रारदाराकडे देऊन पोलिसांनी सापळा रचून केपे येथील मुनलाईट नामक हॉटेलात पिंटो याना पैसे घेताना रंगेहाथ पकडले होते. एसीबीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी त्यांना अटक केली होती.

court
Goa: सायबर चोरट्यांचा पर्यटकांच्या पैशांवर डल्ला; हॉटेल बुकिंगच्या नावाखाली लाखो रूपयांची फसवणूक

या प्रकरणी एकूण 22 साक्षीदार सादर करण्यात आले. पिंटो यांच्यावतीने युक्तीवाद करताना ॲड. सुहास वेळींप यांनी पैसे कुणीही घेतले म्हणून ती लाच होऊ शकत नाही. हे पैसे नेमके कोणत्या कामासाठी घेतले हे सिद्ध व्हायला पाहिजे असा दावा केला. व बोरकर यांच्या विरोधात जी चौकशी चालू होती ती मामलेदार करत होते.

एक साधा निरीक्षक ही चौकशी कशी बंद करू शकतो? असा सवाल उभा करून आपल्या अशिलाला या प्रकरणात विनाकारण गुंतविल्याच्या दावा केला. न्यायालयाने हा मुद्दा ग्राह्य धरताना पिंटो याना निर्दोषमुक्त केले. अभियोग पक्षाच्यावतीने व्ही. जी. कोस्टा यांनी बाजू मांडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com