केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांची सरशी

तीन पंचायतींवर काँग्रेसचा झेंडा
Alton D'Costa
Alton D'CostaDainik Gomantak

सासष्टी: केपे मतदार संघातील काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सात पैकी मोरपिर्ला, बाळ्ळी व नाकेरी बेतुल या तीन पंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापीत केले असून या तीनही पंचायतीत त्यानेच पाठिंबा दिलेले सरपंच व उपसरपंच निवडले आले आहेत.

(Quepem MLA Alton D'Costa wins three panchayats)

मोरपिर्ला पंचायतीत सरपंच म्हणुन आश्विनी गावकर तर उपसरपंच म्हणुन प्रकाश अर्जुन वेळीप, बाळ्ळी पंचायतीत गोविंद दत्ता फळदेसाई सरपंच व बिंदिया गावकर यांची उपसरपंचपदी निवड झाली. नाकेरी बेतुल पंचायतीत प्रितम देउलकर सरपंच तर किशोर नाईक यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. मोरपिर्ला पंचायतीत 5 विरुद्ध 2, बाळ्ळी पंचायतीत 6 विरुद्ध 3 तर बेतुल पंचायतीत 6 विरुद्ध 1 अशा फरकाने सरपंच व उपसरपंच निवडून आले.

फातोर्पा, खोला, बार्से या तीन पंचायतीत त्यांचे प्रत्येकी दोन तर आवेडे पंचायतीत तीन पंच निवडुन आले. केपे मतदारसंघात काँग्रेसने पाठिंबा दिलेले 33 पंच सदस्य निवडून आल्याचे त्यांनी सांगितले. आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार एल्टन डिकॉस्ता यानी आपल्या तीनही पंचायतीतील सरपंच व उपसरपंच तसेच बाकी पंचायतीतील पंचांना आमंत्रीत केले होते. गेल्या चार महिन्यात आपल्या तर्फे मतदार संघात जे काम झाले त्यामुळे आपल्याला हे यश प्राप्त झाले. सर्व पंचायतीतील मतदान पाहिले तर आपण 1740 मतांची आघाडी मिळवली असे आमदाराने सांगितले.

आम्ही फोडाफोडीचे राजकारण करणार नाहीत तरी भविष्यात उर्वरीत पंचायतीही आपल्या ताब्यात येतील असा विश्वासही त्याने व्यक्त केला. केपे मतदार संघाला पहिल्या क्रमांकावर आणणे हे आपल्या बरोबरच सर्व निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच व पंचांचे असल्याचे डिकॉस्ता यानी सांगितले.

निवडून आलेल्या सर्वच सरपंचांनी या वेळी बोलताना आपल्या गावचा विकास हेच ध्येय घेऊन आम्ही एकवटीतपणे काम करणार आहोत असे सांगितले. केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही काम करणार तसेच सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com