केपेचे मामलेदार 'ऑन धी टोज'

केपेच्या मामलेदारांनी पुराच्या पाण्यात शिरत पुरबाधितांना केली मदत
Quepem Pratap gaokar
Quepem Pratap gaokarDainik Gomantak

केपेचे मामलेदार प्रताप गावकर यांना धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जाते. अडचणीला धावून जाणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. केपे येथे कुशावती नदीला पूर आला आणि लोकांना आपत्कालीन मदत देण्याची वेळ आली तेव्हा आणखी हा प्रत्यय आला आहे. (Quepem Pratap gaokar helped flood victims )

Quepem Pratap gaokar
एफसी गोवाच्या आक्रमणात आणखी एक स्पॅनिश

मिळालेल्या माहितीनुसार रावाभाट केपे येथे पुराच्या पाण्याच्या विळख्यात दोन घरे सापडली आहेत. ही स्थिती पाहता कोणता ही विचार न करता गावकर हे सरळ पुराच्या पाण्यात शिरले. व त्यांनी पुराने वेढा दिलेल्या घरातील नागरिकांना मदत करत आपत्तीग्रस्त नागरिकांना बाहेर काढण्यात पुढाकार घेतला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मदत करण्यात ते रात्रभर 'ऑन धी टोज' म्हणतात तसे कार्यरत होते. त्यांचा व्हिडिओ देखील भलताच व्हायरल झाला आहे.

Quepem Pratap gaokar
पुरामुळे घरात अडकलेला मृतदेह अग्निशमन दलाने काढला बाहेर

गोव्यातील 1,461 चौरस किमी क्षेत्र पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये गोव्यातील 1,461 चौरस किलोमीटर क्षेत्र पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (ESA) म्हणून ओळखले गेले आहे.

अधिसूचनेद्वारे, केंद्राने 56,825 चौरस किलोमीटर क्षेत्र ओळखले आहे जे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये पसरलेले आहे, पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com