गोमेकॉत रक्त तपासणीसाठी रांगा : रुग्णांचा जीव कासावीस

गोमेकॉतील प्रकारामुळे संताप : अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे यंत्रणा कोलमडली
गोमेकॉत रक्त तपासणीसाठी रांगा : रुग्णांचा जीव कासावीस
Queues for blood tests at GMCDainik Gomantak

पणजी: रक्त तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात आलेल्या रुग्णांची ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशी अवस्था शुक्रवारी झाली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या रुग्णांना केवळ रक्त तपासणीसाठी तासन्‌ तास उभे राहावे लागत आहे. गोमेकॉतील एकूण ढिसाळ व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांची बेपर्वा वृत्ती आणि संबंधित विभागप्रमुख तसेच आरोग्यमंत्र्यांकडून होणारे दुर्लक्ष यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

Queues for blood tests at GMC
बाबूश यांच्यावर आरोप करणाऱ्या पीडित मुलीला समन्स जारी करण्याची विनंती

कोरोना महामारीनंतर आता विविध आजारांचे रुग्ण रक्त तपासणीसाठी गोमेकॉत येत आहेत. या रुग्णांना नोंदणीनंतर कुपन दिले जाते आणि त्यानंतर त्यांचे नमुन्यासाठी रक्त काढले जाते. शुक्रवारी वॉर्ड क्र. 13 मध्ये रक्त तपासणीसाठी आलेल्या रुग्णांमध्ये गर्भवती, केमोथेरपीचे रुग्ण, मधुमेह अशा अनेक व्याधींनी त्रस्त शेकडो रुग्ण अन्न-पाण्यावाचून रांगेत ताटकळत उभे होते. शेवटी तपासणीची वेळ संपल्यामुळे अनेकांना निराश होऊन परत जावे लागले. शारीरिक वेदना होत असतानाही मोठ्या आशेने रुग्णांनी दिवसभर प्रतीक्षा केली आणि तपासणी झाली नाही म्हणून शेवटी गोमेकॉवर संताप व्यक्त करत घरचा रस्ता धरला. अनेक रुग्ण दुसऱ्या दिवशी आलो तर तपासणी होईल की नाही, याबाबत संभ्रमात होते. कारण गोमेकॉच्या कर्मचाऱ्यांच्या मते, ही अशी गर्दी रोजच असते. त्यांना रोजच रुग्णांचे शिव्याशाप ऐकावे लागतात.

मधुमेही उपाशीपोटी; काहींना चक्कर

शुक्रवारी 11 वाजता दीडशेहून अधिक रुग्ण रांगेत होते. यामध्ये बरेच जण मधुमेहाचे रुग्ण होते. त्यामुळे त्यांना उपाशीपोटी बोलविले होते. 12 वाजेपर्यंत नंबर न लागल्यामुळे उपाशीपोटी असलेल्या काहीजणांना चक्कर येत होती. आधीच रक्त काढायचे. आता जेवल्यानंतर कधी रक्त द्यायचे? असा प्रश्न फोंडा येथील एका महिलेने उपस्थित केला. उत्तर प्रदेशातील एका गर्भवतीला डॉक्टरांनी 11 वाजताचा वेळ दिला होता. मात्र ती 12.30 वाजेपर्यंत रांगेतच होती. रक्ताचे नमुने दिल्यानंतर पुन्हा एकदा मला डॉक्टरांकडे नंबर लावायचा आहे. पोटात काहीच नसल्यामुळे चालणेही मुश्किल झाले आहे, मी काय करू...असे ती सांगत होती.

स्थिती कधी सुधारणार?

गोमेकॉत तपासणीसाठी जाणे म्हणजे रांगेत उभे राहणे, असे समीकरण झाले आहे. अत्याधुनिक यंत्रणनेने संपन्न असलेल्या गोमेकॉतील ही ‘वेटींग’ पद्धत कधी बंद होणार? असा प्रश्न केला जात आहे. वृद्धांना उभे राहणेही असह्य : फोंडा येथील गुलाबी सतरकर या वृद्ध महिला केमोथेरपीसाठी येतात. त्यांना रक्ताचे नमुने द्यायचे होते. सकाळी ८ वाजल्यापासून त्या रांगेत होत्या. अशक्तपणा प्रचंड असल्याने तिला उभे राहणे असह्य झाले होते. ही महिला सुरक्षा रक्षकाकडे आपला नंबर कधी येणार, याची सतत विचारणा करीत होती.

Queues for blood tests at GMC
मडगावात 1 लाख 46 हजारांचे अंमली पदार्थ जप्त

केवळ दोनच कर्मचारी

गोव्यातील एकमेव अत्याधुनिक अशा गोमेकॉमध्ये रक्ताचे नमुने घेण्यासाठी केवळ दोनच कर्मचारी उपस्थित होते. जाणून घेतल्या, तेव्हा त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. गोमेकॉ हे आमच्यासाठी एकमेव आशेचा किरण आहे. परंतु येथील कारभार बघता, येथे रांगेत राहूनच जीव जाईल का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे काहीजणांनी निराशाजनक वक्तव्य केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com