गोव्यात येण्यासाठी वाहनांच्या रांगा

Dainik gomantak
बुधवार, 24 जून 2020

प्रस्तुत प्रतिनिधीने पत्रदेवी नाक्यावर भेट दिली असता परराज्यातून गोव्यात प्रवेश करण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या बरीच मोठी असल्याचे दिसून आले. याठिकाणी कोरोनाविषयक तपासणी करण्याचा शुल्क आकारणी खिडकीजवळ अनेकजण उभे होते. शुल्क भरल्यानंतर ते तपासणीसाठी आझिलो हॉस्पिटल म्हापसा येथे जात होते. काहीना येथून घेवून जाण्यासाठी त्यांचे नातेवाईक गाड्या घेवून उभे होते. नाक्यावर नोंदणी करून गोव्यात प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या या नागरिकांमध्ये गोमंतकीय व्यक्तीपेक्षा परप्रांतीय मजुरांचा भरणा अधिक असल्याचे दिसून आले. त्यात लखनौ, उत्तरप्रदेश, मुंबई, पुणे याबरोबरच कोकण, कर्नाटक येथील मजुरांचा समावेश होता.

मोरजी,   (प्रतिनिधी) राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असताना पत्रादेवी चेक नाक्यावर गोव्यात प्रवेश करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यात परराज्यातून येणाऱ्या मालवाहू ट्रकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. फक्त रेती, खडी घेवून येणाऱ्या ट्रकांची रांग लांबवर लागलेली असते.
सोमवारी प्रस्तुत प्रतिनिधीने पत्रदेवी नाक्यावर भेट दिली असता परराज्यातून गोव्यात प्रवेश करण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या बरीच मोठी असल्याचे दिसून आले. याठिकाणी कोरोनाविषयक तपासणी करण्याचा शुल्क आकारणी खिडकीजवळ अनेकजण उभे होते. शुल्क भरल्यानंतर ते तपासणीसाठी आझिलो हॉस्पिटल म्हापसा येथे जात होते. काहीना येथून घेवून जाण्यासाठी त्यांचे नातेवाईक गाड्या घेवून उभे होते. नाक्यावर नोंदणी करून गोव्यात प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या या नागरिकांमध्ये गोमंतकीय व्यक्तीपेक्षा परप्रांतीय मजुरांचा भरणा अधिक असल्याचे दिसून आले. त्यात लखनौ, उत्तरप्रदेश, मुंबई, पुणे याबरोबरच कोकण, कर्नाटक येथील मजुरांचा समावेश होता.
पत्रादेवी चेक नाक्यावरून सिंधुदुर्गातील रेती, खडी घेवून येणाऱ्या ट्रकांचा भरणा खूप होता. त्यामुळे अन्य वाहनांना तिस्टत राहावे लागते.
दरम्यान परराज्यातून येणाऱ्या आणि ज्या गावात त्यांचे विलिगीकारण करण्यात येते त्यांच्या विषयीची माहिती पंचायतीमध्ये पाठवण्यात येत असल्याने अनेक पंचायतीत परराज्यातून परतणाऱ्या मजुरांच्या संख्येत वाढ झाली असल्याने स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. अनेकजण आपला पत्ता सोयीनुसार देत असल्याने कोण कुठून आला हे समजणे कठीण झाले आहे.
 
 

संबंधित बातम्या