गोव्याचे माजी राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांना (सीबीआय) न्यायालयाने ठोठावली शिक्षा

R. K. Srivastava convicted by CBI court was a 1984 AGMU cadre IAS officer
R. K. Srivastava convicted by CBI court was a 1984 AGMU cadre IAS officer

पणजी: दिल्लीतील एका सहकारी संस्थेमधील घोटाळाप्रकरणी गोव्याचे माजी मुख्य सचिव व माजी राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांना दोन वर्षाची शिक्षा दिल्लीच्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयाने ठोठावली आहे. या प्रकरणाची चाहूल लागल्यानेच राज्य निवडणूक आयुक्त पदाची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच घाईघाईने राजीनामा देऊन ते दिल्लीला परतले होते. 


दिल्ली सीबीआय न्यायालयाने तत्कालिन सहकार निबंधक आर. के. श्रीवास्तव व तत्कालिन सहकार संस्थांचे उपनिबंधक पदम दत्त शर्मा यांना दोन वर्षे कारावास तसेच ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त सुंदर चंदर, मयंक गोस्वामी व आश्‍विनी शर्मा यांना चार वर्षांची शिक्षा व दंड ठोठावला आहे. दिल्लीच्या श्री राधाकृष्ण सहकारी गृह संस्थेच्या प्रकरणात बोगस व बनवेगिरी करून दस्तावेज सादर करण्यात आल्याचा ठपका सीबीआयने ठेवला होता. सहकार निबंधक व उपनिबंधकांनी या संस्थेच्या काही व्यक्तींशी कटकारस्थान करून ही बनवेगिरी केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयला गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सीबीआयने सुभाष चंदर याच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या चौकशीवेळी बनवेगिरीला जबाबदार असलेल्या सहकार निबंधक खात्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच खासगी व्यक्तींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. 


सीबीआयने न्यायालयाने शिक्षा दिलेले आर. के. श्रीवास्तव हे १९८४ सालचे अग्मूट केडरमधील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी गोव्यात मुख्य सचिव म्हणून काम केल्यानंतर निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर सरकारने त्यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी निवड केली होती. जिल्हा पंचायत निवडणुकीची प्रक्रियेची तयारी त्यांनी केली होती मात्र कोविड महामारीमुळे ही निवडणूक स्थगित ठेवण्यात आली होती. ही निवडणूक घेण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या असतानाच अचानक आर. के. श्रीवास्तव यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या या निर्णयाबाबत राज्यात चर्चेचा विषय ठरला होता.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com