Agriculture; गोव्यात रब्बी हंगामाला सुरुवात; गावठी वांगी बाजारात दाखल, टोमॅटो स्वस्त

राज्यात अळू माडीला मोठ्या प्रमाणात मागणी असून मध्यम आकाराची ही माडी 80 ते 100 रुपये प्रति नग दराने विकली जात आहे
Vegetable Price | Goa Rabi Crop
Vegetable Price | Goa Rabi CropDainik Gomantak

Agriculture: राज्यात रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून राज्यातील ग्रामीण भागात पिके देखील येऊ लागली आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेली भाज्यासह गावठी वांगी आता बाजारात दाखल झाली असून अनेक ग्राहक ती खरेदी करत आहेत.

80रुपये प्रती किलो दराने तर 60 रुपये प्रती वाटा दराने विकली जात आहेत. टोमॅटो स्वस्त झाला आहे. बेळगाव बाजारात 8 ते10 रुपये असलेला टोमॅटो राज्यातील साप्ताहिक बाजारात 20 ते 25 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.

मटारही पूर्वीपेक्षा स्वस्त आहे. बेळगाव बाजारात 35 रुपये दर असून गोव्यात 40 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. काल पणजी बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होता. स्थानिक भाज्यांसह अळू माडी, रताळी, भाजीची केळी, आदी भाज्यादेखील नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत होते.

राज्यात अळू माडीला मोठ्या प्रमाणात मागणी असून मध्यम आकाराची ही माडी 80 ते 100 रुपये प्रति नग दराने विकली जात आहे, तर मोठी माडी 150 ते 200 रुपये दराने नागरिक विकत घेताना दिसतात. सध्या काही प्रमाणात उकाडा वाढल्याने तसेच नववर्ष स्वागतासाठी पर्यटक आल्याने शहाळ्यांना देखील चांगली मागणी आहे.

Vegetable Price | Goa Rabi Crop
Kalasa Cannal: कळसा प्रकल्पामुळे समुद्राचा खारटपणा वाढणार

राज्यात अळू माडीला मोठ्या प्रमाणात मागणी असून मध्यम आकाराची ही माडी 80 ते 100 रुपये प्रति नग दराने विकली जात आहे, तर मोठी माडी 150 ते 200 रुपये दराने नागरिक विकत घेताना दिसतात. सध्या काही प्रमाणात उकाडा वाढल्याने तसेच नववर्ष स्वागतासाठी पर्यटक आल्याने शहाळ्यांना देखील चांगली मागणी आहे.

भाव:

कांदा 30-40रु, बटाटा 35रु, टोमॅटो 25रु, गवार 60रु, कोबी 40रु, फ्लॉवर 40रु, गाजर 60-80रु, भेंडी-70-80रु, शिमला मिरची-80रु, हिरवी मिरची-100रु

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com