नार्वे पंचायतीत उसरपंचपदाचा रघुवीर वेरेकर यांचा राजीनामा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

आता रघुवीर वेरेकर यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने या पंचायतीत उपसरपंच बदल अटळ आहे. सत्ताधारी गटात ठरल्याप्रमाणे नवीन उपसरपंच म्हणून तुकाराम साळगावकर यांचे नाव निश्‍चित झाले आहे.

डिचोली: विद्यमान पंचायत मंडळाच्या कार्यकाळात आतापर्यंत स्थिर पंचायत म्हणून ओळखण्यात येणाऱ्या डिचोली तालुक्‍यातील नार्वे पंचायतीत आता उपसरपंच बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

विद्यमान उपसरपंच रघुवीर वेरेकर यांनी अलीकडेच उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने आता या पंचायतीला नवीन उपसरपंचाचे वेध लागले आहेत. 

जून २०१७ मध्ये पंचायत निवडणुका झाल्यानंतर आतापर्यंत या पंचायतीच्या सरपंच वा उपसरपंचपदात बदल झालेला नाही. सुरवातीच्या पहिल्याच वर्षी एकदा सरपंच मनिषा आमोणकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करून त्यांना सरपंचपदाच्या खुर्चीवरून खाली खेचण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु ऐनवेळी अविश्वास ठराव बारगळल्याने त्यावेळचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला होता. 

आता रघुवीर वेरेकर यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने या पंचायतीत उपसरपंच बदल अटळ आहे. सत्ताधारी गटात ठरल्याप्रमाणे नवीन उपसरपंच म्हणून तुकाराम साळगावकर यांचे नाव निश्‍चित झाले आहे.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या