निकालाआधीच मोर्चेबांधणी; गोवा काँग्रेसच्या रणनीतीची दिल्लीत बैठक

घडामोडींना वेग; मायकल लोबोंपाठोपाठ चोडणकर, कामतही दाखल
 Goa Assembly Election 2022
Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak

गोवा विधानसभेचे महत्त्वपूर्ण निकाल जवळ येत आहेत, कॉंग्रेससह राजकीय पक्ष संधीचे सोने करण्यासाठी सज्ज आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, कॉंग्रेसने आपल्या हालचालींना वेग दिला आहे. कॉंग्रेस सरकार स्थापन करण्यासाठी तयारी करताना दिसत आहे. गोव्यातील निवडणुकीनंतरच्या (Election) परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी गोव्यातील काँग्रेस नेत्यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस नेते के सी वेणूगोपाल, पी चिदंबरम, दिगंबर कामत आणि नेते गिरीश चोडणकर (Girish Chodankar) उपस्थित होते. नेते मायकेल लोबो यांनी काल दिल्लीला भेट दिली आणि निकालानंतरच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी वेणू गोपाल यांची भेट घेतली होती.

 Goa Assembly Election 2022
दाद कुणाकडे मागावी? पेडणेत पाण्यासाठी महिलांची वणवण

दरम्यान, गोवा विधानसभेच्या (Assembly) निकालाचा जसा दिवस जवळ येत आहे,तसा आता राजकीय घडामोडींना वेग येत आहे. कॉंग्रेसने या विधानसभेत आपण बहुमताने सत्तेत येऊ असे गृहित धरून निकालाआधीच मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे. कालच्या मायकल लोबो (Michael Lobo) यांच्या दिल्ली भेटीनंतर आता गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर दिल्लीत पोहोचले असून माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामतही दुपारी दिल्लीत दाखल झाले.

दिल्लीत काँग्रेस (Congress) हायकमांडसमवेत विशेष बैठक घेतली जाणार असून गोव्यातील राजकीय स्थितीवर चर्चा आणि पुढील रणनीती आखली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत कॉंग्रेसला सत्तेचा सोपान गाठण्याचा आकडा मिळाला आणि इतरांची मदत घ्यावी लागली तर याकरिता भाजपविरोधी (BJP) आघाडी बनवून भाजपला शह देण्याची रणनीती आखली जाणार आहे. यासाठी पक्षाच्या केंद्रीय कमिटीतील संघटन सरचिटणीस त्याच बरोबर कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे डी.के.शिवकुमार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मदत घेतली जाणार असून आज उशिरा किंवा उद्या पक्षाची उच्चस्तरीय बैठक होणार आहे.

 Goa Assembly Election 2022
...त्यामुळे मच्छिमारांच्या उपजिविकेवर होणार परिणाम?

मायकल म्हणतात, दिल्ली भेट फलदायी

माजी मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली, या भेटीत 10 मार्चला निकालानंतर तातडीने सरकार स्थापनेसाठीची सविस्तर चर्चा केल्याची माहिती लोबो यांनी दिली असून आपली दिल्ली भेट फलदायी ठरल्याचे सांगत 10 किंवा 11 तारखेला कॉंग्रेस सरकार (Government) स्थापन करण्यात येईल. या शपथविधी सोहळ्यासाठी आपण पक्षाचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण दिले आहे. वेणुगोपाल यांनी गोव्यात सत्ता स्थापनेसाठीच्या पक्षाच्या केंद्रीय समितीकडून सर्व ती मदत पुरवली जाईल, असे आश्‍वासन दिल्याची माहिती लोबो यांनी दिली आहे.

फोन टॅपिंगचा मुद्दा चर्चेत

गोव्यात (goa) भाजपकडून काँग्रेस नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोपही नुकताच करण्यात आला होता. गिरीश चोडणकर, मायकल लोबो आणि दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत भाजपवर आरोप केले होते. तसंच भाजपला पराभवाची भीती वाटत असल्यानेच अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र गोव्याचे मुख्यमंत्री (CM) प्रमोद सावंत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com