Rahul Gandhi: राहुल यांच्या भाषणाचे काँग्रेसकडून समर्थन

काँग्रेस बैठकीत ठराव मंजूर ः लोकसभेसाठी समविचारी पक्षांशी आघाडी
Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या भाषणाचे गोवा राज्य प्रदेश काँग्रेसने समर्थन केले असून तसा ठराव एकमताने समितीने मंजूर केल्याची माहिती गोवा प्रभारी माणिकम टागोर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. लोकसभेसाठी गोव्यात समविचारी पक्षांना बरोबर घेऊन संयुक्त आघाडी उभारण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, आमदार कार्लुस फरैरा आदी उपस्थित होते.

टागोर म्हणाले, आमचे नेते राहुल गांधी यांनी सत्य परिस्थिती अमेरिकेत मांडली. त्यावरून देशभर राजकीय वादळ उठले. राहुल गांधी यांच्यावर चौफेर टीका होत असून, राहुल यांनी कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही.

तरुणांना संधी देणार

काँग्रेस यापुढे निवडणुकीत तरुण आणि ज्येष्ठांना समान संधी देणार आहे. 50 वर्षांवरील व त्याखालील उमेदवार निवडण्याचे काम या समितीला करावे लागणार असून युवकांना कोणत्याही परिस्थितीत डावलता येणार नसल्याने ज्येष्ठांप्रमाणेच त्यांनाही समान संधी देण्यावर पक्षाचा भर राहणार असल्याचे टागोर यांनी नमूद केले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय राहणार, यावर टागोर म्हणाले, राज्यात संयुक्त आघाडी उभारण्यावर पक्षाचा भर राहील.

Rahul Gandhi
Yuri Alemao: प्रदूषणकारी उद्योग त्वरित बंद करा

सूचना मोहिमेलाही प्रतिसाद

प्रदेश काँग्रेसच्या ‘हात से हात जोडो’ मोहिमेला गोव्यातील प्रत्येक भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यासोबत सूचना देण्यासाठी जारी केलेल्या ई-मेल आणि मोबाईलवरूनही अनेक नागरिक व कार्यकर्त्यांकडून सूचना दिल्या जात आहेत.

या सर्व सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यानुसार पक्षात बदल केले जातील, असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले. राज्यातील भाजप सरकार विविध घोषणा आणि आश्वासने देऊन गोमंतकीय जनतेची फसवणूक करीत आहे. परंतु, ग्रामीण भागातील वस्तुस्थिती पूर्ण वेगळी आहे, असेही पाटकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com