मावळिंगेत जुगार अड्ड्यावर छापा 

dainik gomantak
शुक्रवार, 3 जुलै 2020

अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजू गावकर (३६ वर्षे, मावळिंगे), कमलाकांत मयेकर (४७ वर्षे, कळंगुट), शंकर रेवोडकर (३० वर्षे, 
डिचोली), चांद खान (४० वर्षे, फोंडा), सुबानी दस्तागीर (३७ वर्षे, फोंडा), उत्तम गावकर (५९ वर्षे, मावळिंगे), उदय गावकर (३९ वर्षे, मावळिंगे) व निलेश पर्येकर (२४ वर्षे, डिचोली) यांचा समावेश आहे.

पणजी

गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने डिचोली तालुक्यात मावळिंगे येथील फुटबॉल मैदानाजवळ 
असलेल्या एका शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर काल रात्री उशिरा छापा टाकला. या कारवाईत आठजणांना अटक करून ९० हजार रोख रक्कम त्यांच्याकडून जप्त केली. जुगार प्रतिबंधक कायद्याखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने संशयितांची सुटका झाली अशी माहिती पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली. 
अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजू गावकर (३६ वर्षे, मावळिंगे), कमलाकांत मयेकर (४७ वर्षे, कळंगुट), शंकर रेवोडकर (३० वर्षे, 
डिचोली), चांद खान (४० वर्षे, फोंडा), सुबानी दस्तागीर (३७ वर्षे, फोंडा), उत्तम गावकर (५९ वर्षे, मावळिंगे), उदय गावकर (३९ वर्षे, मावळिंगे) व निलेश पर्येकर (२४ वर्षे, डिचोली) यांचा समावेश आहे. अधीक्षक सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचच्या पथकाने ही कारवाई केली. 
सध्या कोविड - १९ मुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत व वेळ घालवण्यासाठी काहीजण जुगाराकडे वळले आहेत. मावळिंगे येथे एका शेडमध्ये रात्री उशिरापर्यंत जुगार सुरू असतो व शेजारील तालुक्यातील जुगार खेळणारे अनेकजण उपस्थिती लावत असल्याची माहिती अधीक्षक शोबित सक्सेना यांना मिळाली होती. त्यांनी क्राईम ब्रँचचा ताबा घेतल्यानंतर दोन दिवसातच ही कारवाई करून जुगार अड्ड्यावर छापा टाकला. 

 

 

 

संबंधित बातम्या