Goa News: PFI संघटनेचे सरचिटणीस अनिस अहमद यांच्या घरावर छापा

Goa News: पहाटे चारच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला, मात्र तो सापडलाच नाही.
 Anis Ahmed
Anis AhmedDainik Gomantak

Margao: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India) या संघटनेचा मोस्ट वॉन्टेड सरचिटणीस अनिस अहमद याने गोव्यात आसरा घेतला असावा अशी शक्यता गृहित धरून काल एनआयए या दहशतवादी कारवायांविरोधात कारवाई करणाऱ्या पथकाने काल वास्को येथे घरावर छापा टाकला. मात्र, तिथे त्यांना अनीस सापडला नाही अशी माहिती आहे.

काल पहाटे चारच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला होता. सकाळी आठ वाजेपर्यंत यासंबंधी चौकशी चालू होती. यासाठी वास्को पोलिसांची मदत घेण्यात आली होती. यासंबंधी वास्कोचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांना विचारले असता, यासाठी वास्को पोलिसांची मदत घेण्यात आली ही गोष्ट जरी खरी असली तरी प्रत्यक्ष कारवाईत कोणत्याच गोवा पोलिसांना सामील करून घेण्यात आले नाही.

 Anis Ahmed
Goa Politics: 'मगोचे अस्तित्व कायम राहणार'-सुदिन ढवळीकर

त्यामुळे आम्हाला या कारवाईबद्दल काहीच माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. एनआयएचे सुमारे 30 अधिकाऱ्यांचे पथक गोव्यात आले होते. त्यातील काही अधिकाऱ्यांनी काल हा छापा टाकला. ज्या घरावर हा छापा टाकला ते अनिसच्या दूरच्या नातेवाईकांचे असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना येथे अनीस सापडला नाही. तो बंगळुरू येथे पळून गेला असावा अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

मडगाव येथेही पॉप्युलर फ्रंटचे बरेच कार्यकर्ते असून त्यांचे मडगाव येथेही काम चालू आहे. एनआयए पथकाने याही हालचालीची माहिती घेतली असल्याची माहिती असून हा तपास अत्यंत गुप्तपणे चालू होता. एनआयएचे अधिकारी उशिरापर्यंत मडगाव येथेच होते अशी माहिती आहे.

 Anis Ahmed
MP Francisco Sardinha: 'दाबोळी विमानतळ कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही'

पॉप्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रारी-

पॉप्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांविरोधात देशभरात एनआयएने कारवाई सुरू केलेली असताना रुमडामळ - दवर्ली येथील या संघटनेचे कार्यकर्ते चर्चेत आले आहेत. या भागात या संस्थेच्या कारवाया वाढत असून त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे असे निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे.

 Anis Ahmed
NIA RAID: केरळपासून ते तामिळनाडूपर्यंत पीएफआयचे तीव्र निदर्शने

यापूर्वी रुमडामळ येथील पंच उमरान पठाण आणि आणखी एक सदस्य सैफुल्ला यांच्या विरोधात त्यांनी पाकिस्तान झिंदाबाद म्हटल्याची तक्रार गोव्यातील विविध पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती. यावेळी पंचायत निवडणुकीत रुमडामळ येथे सर्व मुस्लिम सदस्यांनी एकत्र येऊन आपली सत्ता या पंचायतीवर आणली होती. यामागेही पॉप्युलर फ्रंटचा हात असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com