पावसाची संततधार सुरूच

rain in panjim
rain in panjim

तेजश्री कुंभार

पणजी :

राज्यात बुधवारी सकाळपासून जोरदार वाऱ्यासह संततधार पाऊस सुरू होता. त्‍यामुळे राजधानी पणजीतील रस्‍त्‍यावर पाणी साचले. राज्यात आज सकाळपासून सरासरी ३१.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच तापमानावरही परिणाम झाला असून पारा खाली उतरला आहे. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत कमी प्रमाणात असणार आहे.
गेल्या चोवीस तासात राज्यात किमान २४ अंश सेल्सिअस आणि कमाल २८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
आतापर्यंत यावर्षी राज्यात सरासरी १८१९.४ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर सामान्य पावसाचे प्रमाण सरासरी १८१९.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरी ३० टक्क्यांनी अधिक असल्‍याची माहिती गोवा वेधशाळेने दिली.
वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पेडणे येथे ०२७.८ मि.मी., पणजी ०३१.२, जुने गोवे ०३८.०, साखळी ०२६.४, काणकोण ०५३.२, दाबोळी ०३५.८, मडगाव ०२५.४, केपेत ०४३.६, साखळीत ०३२.८ मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, दिवभरातील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. राजधानी पणजीत रस्ते पाण्याखाली गेले होते. तर पणजी बसस्थानकासमोर आणि मिरामार किनाऱ्यासमोर पाण्याचे तळे साचले होते. काही ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या मोडून पडण्याच्या घटनाही घडल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com