सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा तडाखा; मेघगर्जनेसह डिचोलीत पर्जन्यवृष्टी
Bicholim Dainik Gomantak

सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा तडाखा; मेघगर्जनेसह डिचोलीत पर्जन्यवृष्टी

गेल्या दोन दिवसांप्रमाणेच आज मंगळवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. मात्र पावसाचा जोर कमी होता.

डिचोली: गेल्या दोन दिवसांप्रमाणेच आज मंगळवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. मात्र पावसाचा जोर कमी होता. साधारण अर्धा तास बरसात केल्यानंतर पावसाने ऊसंत घेतली. पाऊस ओसरला असे वाटत असतानाच, सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान मेघगर्जना करीत पावसाने जोरदार हजेरी लावली.

Bicholim
टॅक्सी व्यवसायाला न्याय देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा पुढाकार..

सायंकाळी डिचोलीत (Bicholim) सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. एक तासाहून अधिक वेळ पावसाने झोडपून काढल्याने नागरिकांची पुरती तारांबळ उडाली. रात्री साडे सातनंतर पावसाचा जोर किंचित कमी झाला. तरी पावसाची रिपरिप आणि अधूनमधून ढगांचा गडगडाट चालूच होता. जोरदार पावसामुळे आजही सर्वत्र पाणी साचले होते. दरम्यान, आजच्या पावसामुळे सायंकाळपर्यंत कोणतीही विपरीत घटना घडली नाही. एकही कॉल आला नसल्याची माहिती डिचोली अग्निशामक दलाकडून मिळाली आहे.

तुळशी विवाहात विघ्न

दरम्यान, तालुक्यातील काही भागात मंगळवारी तुळशी विवाह समारंभांना पावसाचे गालबोट लागले. पिळगाव, कारापूर आदी काही भागात आज तुळशी विवाहाची लगबग सुरु असतानाच पावसाचे विघ्न निर्माण झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. काहींनी तर पावसाच्या गडबडीतच तुळशी विवाह उरकून घेतले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com