राज्यातील पणजी आणि मुरगाव येथील पर्जन्यमापन केंद्रांनी केली शंभरी पार

weather.jpg
weather.jpg

पणजी : अतिवृष्टीमुळे (Heavy rain) होणारे नुकसान टाळण्यासाठी पर्जन्यमापन यंत्रणा सक्षम असायला हवी. पण, गेल्या शंभर वर्षात या यंत्रणेत बदल झालेला नाही. राज्यातील पणजी (Panaji) आणि मुरगाव येथील पर्जन्यमापन केंद्रांनी शंभरी पार केली आहे, तर अकरा केंद्रांना साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. काचेच्या बाटल्यांना नाळक्या लावून त्यातून बाटलीत जमणाऱ्या पावसाच्या  (rain) पाण्यावरून पर्जन्यमापन करण्याची जुनीच पद्धत आजही अवलंबली जाते, अशी तेरा पर्जन्यमापन केंद्रे गोव्यात (Goa) आहेत. त्यातील पणजी आणि मुरगाव येथील केंद्रांना शंभर वर्षे उलटली आहेत. विषेश म्हणजे आजही या केंद्रातून अपेक्षित नोंदी मिळतात, याचे समाधान असल्याचे हवामान खात्याचे  (weather department) संशोधक एम. राहुल यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. इतर 11 केंद्रांनाही तब्बल 60 वर्षांची कारकीर्द आहे. (Rain gauges at Panaji and Murgaon in the state have crossed the 100 mark) 

अलीकडे 2014 मध्ये तीन नव्या केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. ही केंद्रे स्वयंचलित आहेत. जुन्या केंद्रातून येणाऱ्या नोंदणीबाबत कधीच गफलत होत नाही, असे एम. राहुल म्हणतात. नव्या यंत्रणेबाबतही शाशंकता नाही. पण, दोन्ही यंत्रणेत तफावत नक्कीच असते, असे ते म्हणाले.

कसे होते पर्जन्यमापन ?

रेकॉर्डिंग यंत्र स्वयंचलित असून याद्वारे नक्की किती पाऊस पडला याचा विश्वासार्ह अंदाज लावता येतो. पावसाचे पाणी भांड्यात जमा केले जाते आणि पडणाऱ्या पावसाच्या तीव्रतेतून माहिती गोळा केली जाते. रेकॉर्डिंग पर्जन्यमापक हे स्वयंचलित असून; त्यामध्ये घड्याळावर चालणारा ड्रम, त्यावर बसवलेले आलेखपात्र आणि त्यावर आलेखन करणारी पेन्सिल, इत्यादींचा समावेश असतो. पर्जन्यमापकावर ठरावीक कालावधीत पडलेला पाऊस मोजता येतो. म्हणूनच डोंगरदऱ्यांच्या दुर्गम भागात याचा वापर सोयीचा होतो. या उपकरणाच्या वापरासाठी माणसाची गरज नसते.


नॉन रेकोर्डिंग पर्जन्यमापक हे अगदी साधे सोप्पे यंत्र असून याद्वारे निश्चित असे प्रमाण सांगता येत नसले, तरी पाऊस किती पडला असेल याचा एक अंदाज बांधता येतो. ही पद्धती भारतात मोठ्या प्रमाणात वापरता येते. या उपकरणाला ‘सायमन्स रेनगेज’ म्हटलं जातं. नॉन रेकॉर्डिंग पर्जन्यमापक हे फार सोपे आणि साधे उपकरण आहे. भारतामध्ये मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या उपकरणाला ‘सायमन्स रेनगेज’ या नावाने ओळखले जाते. हे पर्जन्यमापक जमीन पातळीवर पक्के बसवलेले असते. दररोज सकाळी आठ वाजता पर्जन्यमापकाच्या बाटलीत जमा झालेला पाऊस प्रमाणित मोजपात्राद्वारे मिलिमीटर वा इंचामध्ये मोजला जातो. या पर्जन्यमापकाद्वारे मागील २४ तासांतील पडलेला पाऊस मोजता येतो. पाऊस जमा करणारी बाटली साधारणतः 100 मिमी व्यासाची असते आणि ती 100 ते 125 मि. मी. पाऊस जमा करते. मोठ्या पावसाच्या कालावधीत दिवसातून तीन -चार वेळा मोजणी करावी लागते.


पर्जन्यमापन दोन पद्धतीने केले जाते, त्यात यांत्रिकी आणि पारंपरिक असे प्रकार आहेत. 2014 नंतर यांत्रिकी पध्दतीचे पर्जन्यमापन यंत्र सुरू करण्यात आले आहे. दोन्हीची नोंदीत तफावत असते, पण नोंदी चुकीच्या असतात असे नाही. प्रत्येक भागातील पर्जन्यमानावरून या नोंदी ठरत असतात. पारंपरिक यंत्रणा शंभर वर्षे जुनी असली तरी विश्वासार्हता कायम आहे. तसेच अतिवृष्टीमुळे उद्‍भवणारे धोके लक्षात घेता ही यंत्रणा अधिक सक्षम व्हायला हवी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com