Goa Weather: दक्षिण गोव्याला पावसाने झोडपले; वारा, पावसामुळे लाखाेंचे नुकसान

अनेक ठिकाणी झाडे पडली; लाखोंची हानी
Goa Weather
Goa WeatherDainik Gomantak

Goa Weather दक्षिण गोव्याला सोमवारी रात्री पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह कोसळलेल्या सरींमुळे वीज खात्याचे लाखोंचे नुकसान झाले. वीजप्रवाह खंडित झाला. अनेक ठिकाणी झाडे पडली. झाडे पडून काहींच्या घर, वाहनांचे नुकसान झाले.

काणकोण तालुक्यात 15 वीज खांब मोडून पडल्याने खात्याचे सुमारे 14 लाखांचे नुकसान झाले. पाळोळे येथे दोन पर्यटकांच्या वाहनांवर माड उन्मळून पडले. सप्लेश धुरी आणि सम्राट धुरी यांच्या कारवर आंब्याचे झाड पडल्याने कारचे नुकसान झाले.

Goa Weather
CM Pramod Sawant: सिमेंटच्या रस्त्यांचे काम पावसाळ्यातही सुरू राहणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

साकोर्डात झाडांची पडझड

तांबडीसुर्ला : साकोर्डा, मोले भागात जोरदार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांचे बरेच हाल झाले. मोले परिसरालाही अवकाळी पावसाने झोडपले. वादळी वारे सुटल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली.

यात वीज खांबांचीही मोडतोड झाली. गवळीवाडा-मोले येथे रस्त्यावर उन्मळून झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा आला. हे झाड अर्धवट तोडून अर्धा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

खांडोळा : सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसामुळे वीज खंडित झाल्याने बाणस्तारी, भोमा, अडकोण, तिवरे, वरगाव, माशेल, बेतकी, खांडोळा परिसरातील लोकांनी रात्र उकाड्यात जागून काढली.

काहींनी अंगणात, गॅलरीमध्ये झोपणे पसंत केले. मात्र, लहान मुलांना याचा जास्त त्रास सहन करावा लागला. वीज कर्मचारी रात्रभर शोध घेत होते, पण त्यांना बिघाड सापडला नाही.

मंगळवारी दुपारी वीज आल्यावर इतर व्यवहार सुरळीत झाले. भोमा डोंगर माथ्यावर व्ही-क्रॉस आर्ममध्ये बिघाड झाला होता. अभियंते अरविंद ढवळीकर यांच्या मार्गदर्शनखाली दुरुस्ती करण्यात आली.

Goa Weather
Goa Petrol-Diesel Price: इंधन भरण्यापूर्वी गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

किनारी भागात सोमवारी रात्रीपासून वीज प्रवाह खंडित झाला. मंगळवारी सकाळपासून वीज खात्याचे कर्मचारी नवीन खांब आणि वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करत आहेत. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होईल.

- गोविंद भट, साहाय्यक अभियंता, वीज खाते.

Goa Weather
Zuari Bridge: 300 वाहनचालकांना दंड ठोठावत तब्बल 72 हजारांचा महसूल जमा

वाहनांचे नुकसान

बेताळभाटीत एका कारसह तीन दुचाकींवर झाडे कोसळली. इतर भागांतही झाडे पडली. यादरम्यान मनुष्यहानी टळली. मात्र, वाहनांचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी धाव घेऊन झाडे हटविली.

आगाळी येथे एका घरावर झाड कोसळले. रावणफोंड येथील शेणवी हायस्कूलजवळ व जाकनीबांद या ठिकाणीही झाडे पडली. मात्र, किती रुपयांचे नुकसान झाले समजले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com