सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह पावसाचा तडाखा.. !

डिचोलीत सर्वत्र नागरिकांची तारांबळ..
सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह पावसाचा तडाखा.. !
Rain Update : Heavy Rain for Second Day in Row Dainik Gomantak

डिचोली: सलग दुसऱ्या दिवशी पावसाने तडाखा (Rain Update) देताना डिचोलीत (Bicholim) सर्वत्र जोरदार बरसात केली. कालच्या तुलनेत मात्र आज पावसाचा (Rain) जोर किंचित कमी होता आणि कालच्याप्रमाणे मेघगर्जनाही झाली नाही.

Rain Update : Heavy Rain for Second Day in Row
गोवा लोकसेवा आयोग करणार 'या' पदांची भरती मिळणार 40 हजारांपर्यत वेतन

काल दुपारी विजांचा लखलखाट आणि मेघगर्जनेसह पावसाने डिचोलीत सर्वत्र तडाखा दिला होता. कालच्याप्रमाणेच आज (सोमवारी) दुपारी डिचोलीत सर्वत्र पर्जन्यवृष्टी झाली. घरोघरी तुळशी विवाहाची तयारी चालू असतानाच काळोख करीत पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दुपारी साधारण तासभर बरसल्यानंतर पाऊस ओसरला, तरी सायंकाळपर्यंत पावसाळी वातावरण होते. अधूनमधून पावसाची रिपरिप चालू होती. पावसामुळे आजची रस्त्याच्या बाजूने पाणी साचले होते. दरम्यान, आजच्या पावसामुळे सायंकाळपर्यंत कोणतीही विपरीत घटना घडली नाही. एकही कॉल आला नसल्याची माहिती डिचोली अग्निशामक दलाकडून मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com