Goa Rain Update : आज, उद्या राज्यात ऑरेंज अलर्ट जारी

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने वर्तवली आहे.
Goa Orange Alert
Goa Orange AlertDainik Gomantak

पणजी : गेल्या 18 दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होत असून बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने वर्तवली आहे. या दोन्ही दिवशी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

राज्यात सोमवारपासूनच नव्या मच्छीमार हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र पुढील पाच दिवसांसाठी गोवा तसेच कर्नाटक तटीय मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या सरींसोबतच 40 कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाची उपस्थिती तसेच सध्याच्या स्थानावरून शिअर झोनचे उत्तरेकडे सरकण्याच्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. उद्या व परवा राज्यात पावसाचे प्रमाण कमी असेल. मात्र, शुक्रवार व शनिवारी पाऊस अधिक प्रमाणात असेल, अशी माहिती एम. राहुल यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com