Goa Rain Updates: सोमवारपासून राज्यात पुन्हा पावसाचा इशारा

वादळांबाबत राज्याच्या हवामान खात्याच्या वेधशाळेने अद्याप स्पष्ट संकेत दिलेले नाहीत
Goa Rain Updates: सोमवारपासून राज्यात पुन्हा पावसाचा इशारा
rainfall activity is very likely from around 28th November over both districts of Goa

पणजी: गोवा राज्यात (Goa Rain) रविवारपर्यंत पाऊस (Rain Updates) उसंत घेणार आहे. मात्र, सोमवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज गोवा हवामान खात्याच्या वेधशाळेने (IMD Goa) वर्तवला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात येऊ घातलेल्या वादळांचा हा परिणाम असेल.

वादळांबाबत राज्याच्या हवामान खात्याच्या वेधशाळेने अद्याप स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. मात्र, पुणे येथील वेधशाळेने वादळांचा इशारा दिला आहे. पण त्याची निश्‍चित माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. गुरुवारी राज्याला पावसाने दिलासा दिला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासूनचा निरुत्साह दूर झाला. रविवारपर्यंत पावसाची शक्यता नसली तरी तुरळक सरी पडू शकतात. सोमवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढेल, असे हवामान खात्याच्या वेधशाळेने म्हटले आहे.

rainfall activity is very likely from around 28th November over both districts of Goa
केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक 2 डिसेंबरला गोव्यात

28 नोव्हेंबरपासून वाऱ्याच्या पॅटर्नमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याने, 28 नोव्हेंबरपासून गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29 तारखेपासून दोन्ही जिल्ह्यांत एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळाचीही शक्यता हवामान वेधशाळेनं व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com