गोव्यात विविध प्रकारच्‍या ढगांपासून पर्जन्‍यवृष्‍टी

ढगांचे अनेक प्रकार आहेत, त्यावर पावसाचे प्रमाण अवलंबून असते. त्यामध्ये स्टार्टस् क्लाऊडच्या काळात गोव्यात बहुतेकवेळा सूर्यदर्शनही होत नाही.
गोव्यात विविध प्रकारच्‍या ढगांपासून पर्जन्‍यवृष्‍टी
CloudsDainik Gomantak

पणजी: गोव्‍यात (Goa) सर्वाधिक बाष्पीभवन हे एप्रिल, मे आणि नोव्हेंबर महिन्‍यात होते. त्यामुळे राज्याच्‍या अनेक भागांत वेगवेगळ्या प्रकाराचे ढग (clouds) निर्माण होऊन त्यानुसार पर्जन्यवृष्टी (Rain) होते, अशी माहिती भारतीय हवामान वेधशाळेचे (IMD) संशोधक सौरव मिश्रा यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून हवामान वेधशाळेने हवामान विषयक परिसंवादांचे आयोजन केले आहे, त्यात ते बोलत होते.

ढगांचे अनेक प्रकार आहेत, त्यावर पावसाचे प्रमाण अवलंबून असते. त्यामध्ये स्टार्टस् क्लाऊडच्या काळात गोव्यात बहुतेकवेळा सूर्यदर्शनही होत नाही. याच काळात घाटात गडद ढग दाटून येतात. गोव्यात बऱ्याचवेळेला ‘स्टार्टोम्युलस क्लाऊड’ येतात, ज्यांच्याबद्दलचे संशोधन वा अभ्यास झालेला नाही. राज्यात ‘अक्टोक्युमुलस’ ढग मोठ्या प्रमाणात दाटून येतात. गेल्या वर्षी सप्टेबर आणि ऑक्टोबर महिन्यात हे ढग अधिक प्रमाणात दिसले होते. राज्यात ‘अल्टोस्ट्राटस क्वाऊड’च्या काळात हमखास पाऊस होतो, असे निदर्शनास आले आहे, असे सौरव मिश्रा यांनी सांगितले.

Clouds
'आमठाणे'तील पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात

विशेषतः लेंटिक्युलर क्लाऊड हे राज्याच्या अभयारण्‍याच्‍या प्रदेशात पाहण्यात आले आहेत. त्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस होत नसला, तरी संततधार तुरळक पाऊस होतो, असे निदर्शन आहे. दुसरी गोष्‍ट अशी आहे,की राज्‍यात अलिकडे वॉटर स्पाऊटच्या घटना वाढल्या आहेत. त्‍याचे दोन प्रकार असून, त्यामध्ये थंडर स्पाऊट आणि फेअर वेदर वॉटर स्पाऊट यांचा समावेश होतो. दोन महिन्यांपूर्वी कळंगुट येथे फेअर वॉटर स्पाऊटचा अनुभव स्थानिकांनी घेतला होता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com