Goa Monsoon Update: हवामान अंदाजाला हुलकावणी; कोसळधार सुरूच!

monsoon goa.jpg
monsoon goa.jpg

पणजी: ‘यलो अलर्ट’ असतांनाही आज पहाटेपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सोबतीला वादळी वारे असल्याने समुद्र खवळला असून पाच ते सहा मिटर उंचीच्या लाटा आहेत. एकंदर, आजदेखील हवामान वेधशाळेच्या अंदाजाला पावसाने हुलकावणी दिली आहे. (Raining in Goa since morning)

पहाटे पाच वाजल्यापासून राज्यात पुन्हा पावसाने ‘दस्तक’ दिली आहे. पावसाचा जोर वाढला आहे. वाळपईत आज सकाळपासून तब्बल 117.0 मी.मी. पावसाची नोंद झाली. राज्याच्या इतर भागातही कोसळधार सुरूच आहे. त्याचा परिणाम दैनंदिन व्यवहारांवर होत आहे. सकाळच्या प्रहारात खरेदीसाठी घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याचे चित्र राज्यात सर्वत्र आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसात काणकोण परिसरात पावसाचा जोर घटला होता, पण आज तेथेही तब्बल 73.0 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पणजी शहर आणि परिसरालादेखील पावसाने झोडपून काढले. त्यामुळे बाजारपेठेतील सकाळी होणारी गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. एकंदर, पावसाने आजही हवामान वेधशाळेच्या अंदाजाला हुलकावणी दिल्यामुळे अद्याप सूर्यदर्शन होऊ शकलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com