"मनोहर पर्रीकरांच्‍या वारशाला पुन्हा तडे," भाजपच्या भ्रष्ट राजवटीचा पर्दाफाश

Rainwater went into Gomecos superspeciality block
Rainwater went into Gomecos superspeciality block

सासष्टी: भाजपच्या भ्रष्ट राजवटीचा आता निसर्गच पर्दाफाश करीत आहे. आज डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या(Dr Shyamaprasad Mukherjee Stadium) कोसळलेल्या काचा व गोमेकॉच्या(Gomeco) सुपरस्पेशालिटी ब्लॉकमध्ये(superspeciality block) आलेल्या पावसाळी पाण्याने((Rainwater) मनोहर पर्रीकर यांच्‍या वारशाला पुन्हा तडे गेले आहेत, अशी टीका दक्षिण गोवा(South Goa) जिल्हा काँग्रेस अध्यक्ष जोसेफ डायस यांनी केली आहे.(Rainwater went into Gomeco’s superspeciality block)

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम व ‘गोमेकॉ’चा सुपरस्पेशालिटी ब्लॉक येथे कोविड रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा प्रशासनावरील ताबा पूर्णपणे गेला आहे, हे आता उघड असून मुख्यसचिव परिमल राय यांनी  झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित दुरूस्तीकाम हातात घेणे गरजेचे आहे. तर, कोविड रुग्णांचे हाल होणार नाहीत याची जबाबदारी सरकारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी जोसेफ डायस यांनी केली आहे.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या दर्शनी भागाच्‍या काचा कोसळणे हे धक्कादायक असून गोमेकॉच्या कालच सुरू करण्यात आलेल्या सुपर स्पेशलिटी ब्लॉकात पाणी येणे म्हणजे भाजपच्या भ्रष्ट कारभाराचे उदाहरण आहे. भाजप सरकारने मागील वर्षांत गोव्यातील हवामानाचा अंदाज न घेताच केलेल्या कामांचे हे उदाहरण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप सरकारने घाईघाईत कामाचा दर्जावर लक्ष न देता, फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी सदर स्टेडियमचे काम पूर्ण करून घेतले व लोकांनी कष्ट करून भरलेल्या करांच्या पैशांची उधळपट्टी केली. गोमेकॉच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकात पाणी कसे शिरले, याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी जोसेफ डायस यांनी केली आहे.

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी सुमारे पंधरा दिवस आधी सरकारला पावसाळ्यात उद्‍भवणाऱ्या समस्यांची जाणीव करून दिली होती. त्यामुळे कोविड व्यवस्थापनात बाधा येणार हे भाजप सरकारच्या लक्षात आणून दिले होते. वीजपुरवठा खंडित होणे, रस्त्यांवर अडथळे तयार होणे, पूर येणे अशामुळे कोविड हाताळणीत बाधा पोहोचणार, असे त्यांनी सरकारला स्पष्ट सांगितले होते. दुर्दैवाने भाजप सरकारने सवयीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले, असे जोसेफ डायस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com