'राजेंद्र आर्लेकरांनी मुख्यमंत्री सावंतांना खर्च कपातीसाठी प्रशिक्षण घेण्याचा सल्ला द्यावा'

कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांचे वक्तव्य
Amarnath Panajikar
Amarnath PanajikarDainik Gomantak

पणजी : गोव्यातील भाजप सरकारने राज्याला दिवाळखोर केले आहे. हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आमदारांना भाजपचा उदोउदो करणाऱ्या संस्थेकडून प्रशिक्षण घेण्याचा सल्ला देण्याऐवजी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंताना खर्च कपात व लोकशाही मुल्यांचे जतन करण्यावर प्रशिक्षण घेण्याचा सल्ला देणे गरजेचे होते असे कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेसचे कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी सर्वप्रथम गोवा विधीमंडळ सचिवालयाने एका पंचतारांकीत हॉटेलात, भाजप व संघाचा उदोउदो करणाऱ्या एका संस्थेमार्फत दोन दिवशीय आमदार प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्यास जाहिर विरोध केला त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र ठरतात असे अमरनाथ पणजीकर यांनी सांगीतले.

Amarnath Panajikar
उच्च न्यायालयाचा दणका; 45 दिवसांत पंचायत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना राज्याची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना एका पंचतारांकीत हॉटेलात लाखो रुपयांची उढळपट्टी करुन जेमतेम दहा आमदारांनी हजेरी लावलेले प्रशिक्षण शिबीर का घेतले यावर प्रश्न विचारणे जमले नाही. ते गोवा विधानसभेचे सभापती होते व विधानसभा संकुलातील सर्व सोयी-सुविधांची जाण त्यांना आहे. त्यामुळे त्यांची दुट्टपी भूमिका स्पष्ट होते असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

निवडणुकीपुर्वी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री व सभापती प्रतापसिंग राणे यांचे नाव भाजपने राजकीय फायद्यासाठी वापरले, परंतु दोन दिवसांच्या आमदार प्रशिक्षण शिबीराला त्यांना मार्गदर्शक म्हणुन निमंत्रीत करण्याचे टाळले. माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप यांचा अनुभव आमदारांना मदतरुप ठरला असता असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

भाजप सरकार आज करोडो रुपयांचा चुराडा करुन केवळ उत्सव व कार्यक्रम आयोजित करुन प्रधानमंत्री मोदी प्रमाणेच आपला उदोउदो करण्यात व्यस्थ असुन, राज्यात आज सामाजीक योजनांचे लाभार्थी, सामान्य जनता, हलाखीच्या स्थितीत जगणारे खेळाडू, कोविड मृतांचे नातेवाईक, शेतकरी हे सरकारच्या अर्थसहाय्याची वर्षानुवर्षे वाट पाहत आहेत. परंतु सरकारला जनतेचे काहिच पडलेले नाही अशी टिका अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com