जुने गोवा येथील वादग्रस्त वास्तू तातडीने पाडा : राजेश फळदेसाई

प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
Rajesh Phaldesai
Rajesh PhaldesaiDainik Gomantak

पणजी : जुने गोवा येथील बेकायदा बांधलेली आणि वादग्रस्त बनलेली वास्तू तातडीने पाडावी, अशी मागणी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी आज (गुरुवारी) प्रश्नोत्तराच्या तासात केली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून यावरती निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

जागतिक वारसास्थळ असणाऱ्या जुने गोवे येथील ‘सी कॅथड्रील’ जवळील बेकायदा बांधलेली आणि वादग्रस्त बनलेली इमारत अजून का पाडली नाही? असा प्रश्न आमदार फळदेसाई यांनी विचारला होता. यावर उपप्रश्न विचारताना फळदेसाई यांनी जनतेच्या प्रश्नाकडे जर सरकारने लक्ष दिले नाही, तर श्रीलंका होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे याबाबीवर तातडीने निर्णय घ्यावा, असा आग्रह धरला. याला विजय सरदेसाई, व्हेन्झी व्हीएगस यांनी साथ दिली.

यावर मुख्यमंत्री म्हणाले, संबंधित इमारतीचा बांधकाम परवाना नगरनियोजन खात्याच्यावतीने रद्द करण्यात आला आहे. याशिवाय पंचायतीने दिलेले इतर सर्व परवाने रद्द करून इमारत पाडण्याचा आदेश काढला आहे. यावर सध्या मामलेदार यांच्याकडे सुनावणी सुरू आहे.

Rajesh Phaldesai
करमल घाटात उलटलेल्या ट्रकवर मालवाहू ट्रक कलंडला

नैसर्गिक हक्काप्रमाणे संबंधिताला आपले म्हणणे मांडता यायला हवे, यावरची पहिली सुनावणी झाली असून, दुसरी सुनावणी 21 जुलैला होणार आहे. काही झाले तरी कायद्यानुसार या इमारतीवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहाला दिली.

सदरची इमारत ही अनेक दिवसांपासून वादग्रस्त बनली आहे. ही इमारत त्वरित पाडावी, या मागणीसाठी ‘आप’चे राज्य समन्वयक अमित पालेकर यांनी बेमुदत उपोषण केले होते. तर स्थानिकांसह साखळी उपोषणही सुरू होते. यावर पंचायत, नगरनियोजन खाते यांनी संबंधित इमारतीचे सर्व परवाने रद्द करून इमारत पाडण्याचा आदेश दिला आहे. त्या अर्थाने ही इमारत अनेक दिवसांपासून वादग्रस्त बनली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com