Goa: राजीव कलामंदिर राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा लवकरच..

Ponda: नाट्य स्पर्धा येत्या 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या काळात आयोजित करण्यात आली आहे.
Rajiv Gandhi Kalamandir
Rajiv Gandhi KalamandirDainik Gomantak

फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिर (Rajiv Gandhi Kalamadir) आयोजित स्वर्गीय रवींद्र लक्ष्मण नाईक स्मृती तिसरी राज्यस्तरीय ऐतिहासिक नाट्य स्पर्धा येत्या 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या काळात आयोजित करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती कलामंदिरच्या सदस्य सचिव स्वाती दळवी यांनी दिली. यावेळी कीर्ती उमर्ये, सुनील केरकर व श्रीकांत गावडे आदी उपस्थित होते.

स्पर्धेत पहिले बक्षीस 60 हजार, दुसरे 50 हजार तसेच तिसरे 40 हजार रुपये, उत्तेजनार्थ पहिले बक्षीस रु. 30 हजार, दुसरे 25 हजार व तिसरे 20 हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येतील. सहभागी संस्थेस प्रोत्साहनपर 5 हजार देण्यात येतील. याशिवाय स्पर्धेत सहभागी संस्थेला प्रवास भाडे म्हणून 10 हजार देण्यात येणार आहेत.

Rajiv Gandhi Kalamandir
Sanguem नगराध्यक्षपदी प्रीती नाईक यांची बिनविरोध निवड

गोव्यातील कुठल्याही नाट्य संस्थेला व गोमंतकीय कलाकारांना या स्पर्धेत भाग घेता येईल. एका संस्थेला एकच प्रवेशिका दाखल करता येईल. नाटक गद्य स्वरुपात असले पाहिजे. मूळ संहितेत पोवाडा असल्यास हरकत घेतली जाणार नाही. स्पर्धेसाठी किमान आठ प्रवेशिका येणे आवश्‍यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्वावर प्रवेश देण्यात येईल.

Rajiv Gandhi Kalamandir
Rajiv Gandhi: राजीव गांधी यांची जयंती 'सद्भावना दिवस' म्हणून का साजरी केला जातो?

* ऐतिहासिक नाटकाचा कालखंड हा 1920 साल किंवा त्या पूर्वीचा असावा. कुठल्याही संस्थेला कॉलर माईकचा वापर करता येणार नाही. स्पर्धेच्या प्रवेशिका फोंडा राजीव गांधी कलामंदिर कार्यालयात येत्या 12 तारखेपासून स्विकारण्यात येतील. तीस संस्थांनाच या स्पर्धेत प्रवेश देण्यात येईल.

* अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्याच दिवशी संध्याकाळी साडेचार वाजता संस्था प्रतिनिधींच्या उपस्थितीत नाट्य सादरीकरणाचा क्रम ठरवला जाईल.

* प्रवेश शुल्क रु. 1 हजार तसेच अनामत रक्कम म्हणून रु. 3 हजार भरावे लागतील. अनामत रक्कम धनादेश स्वरुपात भरावे लागतील. स्पर्धेतून माघार घेण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर असेल. त्यानंतर माघार घेतल्यास अथवा नाट्यप्रयोग रद्द केल्यास अनामत जप्त केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com