केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांच्या भेटीसाठी राजनाथ सिंह थोड्याच वेळात गोव्यात दाखल होणार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 12 जानेवारी 2021

सध्या गोवा दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू तसेच दिल्लीहून केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात येणार आहेत.

पणजी : केंद्रीय आयुषमंत्री तथा संरक्षण राज्‍यमंत्री श्रीपाद नाईक हे कर्नाटक दौऱ्यावरून गोव्यात परतत असताना यल्लापूर - गोकर्ण रस्त्यावर होस्कुंबी येथे सायंकाळी सात वाजता त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात नाईक हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नी विजया व त्‍यांच्‍यासोबत गाडीतून प्रवास करणारे डॉ. दीपक घुमे हे ठार झाले. जखमी नाईक यांना रात्री पावणे बारा वाजण्‍याच्‍या दरम्‍यान अधिक उपचारासाठी ‘गोमेकॉ’त हलवण्यात आले आहे.

सध्या गोवा दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू तसेच दिल्लीहून केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात येणार आहेत. असल्याने पोलिस व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उपराष्ट्रपती दुरपारी अडीच च्या दरम्यान बांबोळी येथिल  गोमेकॉ इस्पितळात पोहचणार असल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीपाद नाईक हे कर्नाटकात गेले होते. ते यल्लापूर येथील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी शिर्शीच्या गणपती देवस्थानात जाऊन दर्शनही घेतले होते. ते यल्लापूर गोकर्ण राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ मार्गे येताना होस्कुंबी, शिरूरमार्गे गोकर्णकडे निघाले असता त्यांच्या कार ला अपघात झाला.

आणखी वाचा:

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांना उपचारांसाठी तात्काळ दिल्लीला हलवण्याची शक्यता -

संबंधित बातम्या