राममंदिर हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक 

विलास महाडिक
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

या रामजन्म भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या राममंदिरासाठी गेली कित्येक वर्षे रस्त्यावरील व न्यायालयीन लढा देण्यात आला आहे. त्या लढ्यामधून सुरू झालेले ते आंदोलन राष्ट्रीय अस्मितेचे झाले होते.

पणजी

गेल्या कित्येक वर्षापासून देशातील श्रीराम भक्तांची असलेली इच्छा अयोध्येत येत्या ५ ऑगस्टला होणाऱ्या रामजन्म भूमिपूजनाने पूर्ण होणार आहे. राममंदिर हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असून ते धार्मिकतेचे नाही. देश समर्थ करण्यास या राममंदिराची आवश्‍यकता होती. सर्व हिंदू संघटनांसह भाजपने तीन दशकापूर्वी हे राममंदिर उभारण्यासंदर्भात घेतलेल्या प्रस्तावाचे फळ आता दिसत आहे, असे मत भाजपचे नेते राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केले. 
पणजीतील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आर्लेकर म्हणाले की, या रामजन्म भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या राममंदिरासाठी गेली कित्येक वर्षे रस्त्यावरील व न्यायालयीन लढा देण्यात आला आहे. त्या लढ्यामधून सुरू झालेले ते आंदोलन राष्ट्रीय अस्मितेचे झाले होते. बाबर भारतात आला तेव्हा त्याने भारतात अस्मितेलाच हात घालत नागरिकांची आस्था व निष्ठा धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला होता. हे राममंदिर व्हावे यासाठी भाजपने मोठा लढा दिला होता त्यामध्ये १९९० साली गोव्यातून सुमारे शंभर कारसेवक तसेच १९९२ साली सुमारे साडेतिनशे कारसेवक अयोध्येला गेले होते त्यामध्ये प्रामुख्याने जर नाव घ्यायचे झाल्यास माजी केंद्रीयमंत्री व गोव्याची माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे घ्यावे लागेल. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला 
गोव्यातून भाजपचे कोणीही कार्यकर्ते सध्याच्या कोविड महामारीमुळे जाणार नाहीत. या कार्यक्रमासाठी भाजपचे काही निवडक नेत्यांची 
उपस्थिती राहणार आहे. या राममंदिराची पायाभरणी करून रामाची ओळख करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्याशी धार्मिकतेचा काहीही संबंध नाही असे त्यांनी स्पष्ट केले. 
यावेळी उपस्थित असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले, अयोध्येत रामजन्म भूमिपूजनाची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या ५ ऑगस्टला होणाऱ्या रामजन्म भूमिपूजन कार्यक्रमावेळी लोकांनी स्वतःच्या घरावर रोषणाई तसेच दिवे लावावेत. यापूर्वी ज्या मंदिरामध्ये रामशिला पूजन झाले आहेत त्या मंदिरामध्ये रोषणाई केली जाईल तसेच घंटानाद करण्यात येणार आहे. राज्यात अनेक भागात या कार्यक्रमासंदर्भातच्या हार्दिक शुभेच्छाचे फलक मंदिराच्या आवारात लावले जावेत. या कार्यक्रमादिवशी राज्यात दिवाळी प्रमाणे तो साजरा करण्यात यावा असे आवाहन तानावडे यांनी केले आहे. 
 

goa goa goa 

संबंधित बातम्या