उत्तर व दक्षिण गोव्यात वसतीगृह: रामदास आठवले

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

उत्तर व दक्षिण गोव्यात वसतीगृह बांधले जाईल, अशी माहिती केंद्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुरगाव सडा येथील एमपीटी अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दाबोळी: उत्तर व दक्षिण गोव्यात वसतीगृह बांधले जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्य सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री तथा केंद्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुरगाव सडा येथील एमपीटी अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी केंद्रीय रिपब्लिकन पार्टीचे सहसचिव बाळासाहेब बनसोडे, गोवा प्रभारी अध्यक्ष उमेश हसापूरकर, गोवा इतर मागासवर्गीय अध्यक्ष दिगंबर तेंडुलकर व गोवा राज्य रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सतीश कोरगावकर उपस्थित होते. आठवले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी डॉ. सावंत यांनी मान्य करून लवकरच पणजी येथे आंबेडकर भवन बांधण्यासाठी पाच हजार चौरस मीटर जागा देणार असल्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात केलेला नवीन कायदा मागे घेतला जाणार नाही. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे. कृषी कायद्यात बदल होणार नाही. त्यात संशोधन करण्यात येईल. यासाठी शेतकरी संघटनेने केंद्र सरकारला सहकार्य करावे, अशी मागणी आठवले यांनी केली.

आणखी वाचा:

गोवा पर्यावरण खात्‍याचे कार्यालय आता पर्वरीऐवजी पणजीत -

संबंधित बातम्या